आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Government Refuses To Provide Security For IPL 2014, Latest News In Divya Marath

आयपीएलसाठी सुरक्षा देण्यास शासनाचा नकार,लोकसभा निवडणुकामुळे सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील लोकसभा निवडणुका लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्रालयाने आयपीएल सामन्यांना सुरक्षा पुरवायला असमर्थता दर्शवली आहे. बीसीसीआयच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सरकारच्या नकारामुळे आता आयपीएलचे सातवे सत्र दक्षिण आफ्रिकेत होण्याची शक्यता आहे.
गृहमंत्रालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते मेदरम्यान लोकसभा निवडणूक होऊ शकते. त्यामुळे आयपीएलला सुरक्षा पुरवणे शक्य नाही. मात्र निवडणुकीनंतर आयपीएलला सुरक्षा मिळू शकते, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. बीसीसीआय सचिव संजय पटेल आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भेटून आयपीएल सुरक्षेसंदर्भात चर्चा केली होती. शिंदेंनीही आयपीएलच्या सातव्या सत्राला सुरक्षा पुरवणे शक्य नसल्याचे सांगितले होते. ते म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक पाहता सरकारकडून आयपीएलला सुरक्षा मिळणे शक्यच नाही. यासाठी आवश्यक सुरक्षा सरकार पुरवू शकणार नाही. मंडळाला निवडणूकीच्या काळात आयपीएलसाठी पर्यायी ठिकाण शोधावे लागेल. यासाठी सध्या दक्षिण आफ्रिकेचा विचार सुरु आहे. याला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता आहे.
निवडणुकीनंतर अंतिम स्वरूप
निवडणूक आयोगाने तारखा जाहीर करताच आयपीएल आयोजनाच्या कार्यक्रमाला अंतिम स्वरूप दिले जाईल, असे बीसीसीआय सचिव संजय पटेल यांनी सांगितले. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल आणि पुन्हा बीसीसीआयच्या कार्यकारी समितीची बैठक भुवनेश्वरमध्ये 28 फेब्रुवारीला होणार आहे. त्या वेळी आयपीएलच्या ठिकाणांसंदर्भात निर्णय घेतला जाईल. यापूर्वी 9 एप्रिल ते 3 जूनदरम्यान स्पर्धा घेण्याचा बीसीसीआयचा विचार होता.