भोपाळ - बॉक्सर मेरी कोमने पुन्हा एक गोल्डन पंच लगावला. लष्कराचे मार्क्समॅन जितू राय यांनी आणखी एक सुवर्ण जिंकले, १६ वर्षांनंतर पुरुष हॉकी संघ आशियाई स्पर्धेत अजिंक्य ठरला. भारताने नुकत्याच झालेल्या इंचियोन आशियाई गेम्समध्ये ५७ पदके जिंकून कसब सिद्ध केले. भारताने ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत ६४ पदके जिंकली होती. म्हणजे वर्षातील दोन
मोठ्या स्पर्धांमध्ये एकूण १२१ पदके जिंकली. सरकारने या दोन्ही स्पर्धांसाठी खेळाडूंचे प्रशिक्षण, डाएटवर १२० कोटी रुपये खर्च केले.
खेळांकडे बघण्याचा सरकारचा दृष्टिकोन गेल्या काही वर्षांत बदलला आहे. त्यामुळेच आशियाई स्पर्धेत गेल्या दोन दशकांत या वेळी पदकांच्या संख्येत अडीचपट वाढ झाली. आशियाई स्पर्धेत १९९४ च्या तुलनेत भारताने ३५ पदके जादा मिळवली आहेत.
, तर राष्ट्रकुल स्पर्धेत ३९ पदके जास्त जिंकली आहेत. आता पुढील वर्ष जूनमध्ये होणा-या आशियाई अॅथलेटिक्स व ऑक्टोबरमध्ये होणा-या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेतूनही अशाच जोरदार कामगिरीची अपेक्षा आहे.
अशी होत गेली प्रगती
कोट्यवधींची बक्षिसे : आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यास खेळाडूंना कोट्यवधी रुपये मिळतात. हरियाणाने तर "कौन बनेगा करोडपती' योजना सुरू केली आहे.
१७६९ कोटी रु.
या वर्षी खेळासाठी एकूण बजेट १७६९ कोटींचे आहे. याआधी १२०० कोटी होते. म्हणजे त्यात ४६ टक्क्यांची वाढ झाली
आहे.
२ कोटी रु.
प्रशिक्षण व आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीसाठी सरकार खेळाडूंना १० लाख ते २ कोटीपर्यंत वैयक्तिक अनुदान देते
डाएटची रक्कम वाढली : ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत खेळाडूंच्या डाएट खर्चासाठी दरदिवशी ३ हजार रुपये देण्यात आले. आधी ही रक्कम दररोज १००० हजार याप्रमाणे होती.
...म्हणून होत आहे प्रगती
स्पॉन्सर फ्रेंडली : प्रो-कबड्डी, इंडियन सुपरलीग फुटबॉल, इंडियन हॉकी लीग, प्रोफेशनल टेनिस लीग आदी स्पर्धांसाठी प्रायोजक मिळण्यास अडचणी आल्या नाहीत. एक वेळ अशी होती की प्रायोजक फक्त क्रिकेटमागे धावत असत.
विदेशी प्रशिक्षकांची रेलचेल : हॉकी, टेबल टेनिस, फुटबॉल, ज्युदो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आदी खेळांत विदेशी प्रशिक्षकांसोबत करार केले जात आहेत. त्यामुळे खेळाडूंची कामगिरी सुधारली आहे.
नोकरीची हमी : पदकविजेत्यांना रेल्वे, बँक, पोलिस आदी संस्थांमध्ये नोकरीत आरक्षण ठेवले जात आहे. हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र व इतर राज्यांत कामगिरीआधारे खेळाडूंना पोलिसांत नोकरी मिळते. मेरी कोम, एल. सरिता देवी पोलिस सेवेत आहेत.