आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडियन ग्रांप्री शर्यत अडचणीत ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुडापेस्ट - भारतात राजकीय हस्तक्षेपामुळे फॉर्म्युला-1 रेसचे आयोजन करणे कठीण काम आहे. यामुळे 2014 मध्ये इंडियन ग्रांप्रीला एफ-वन कॅलेंडरमधून बाहेर केले जाऊ शकते, असा इशारा फॉर्म्युला-1 चे अध्यक्ष बर्नी एक्लेस्टोन यांनी दिला.

कदाचित पुढच्या वर्षांपासून इंडियन ग्रांप्रीचे आयोजन केले जाणार नाही. 2014 मध्ये भारतात ग्रांप्रीचे आयोजन केले जाऊ नये. कारण, तेथे मोठय़ा प्रमाणात राजकारण घडते, असे हंगेरियन ग्रांप्रि रेसदरम्यान एक्लेस्टोन यांनी स्पष्ट केले.

ग्रेटर नोएडा येथील बुद्ध आंतरराष्ट्रीय सर्किटवर 2011 पासून दोन एफ-1 रेसचे आयोजन करण्यात आले. या दोन्ही स्पर्धेत रेड बुलचा सेबेस्टियन वेटल विजेता ठरला. सुरुवातीला या ठिकाणी स्पर्धेच्या आयोजनासाठी सकारात्मक वातावरण निर्माण झाले होते. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरही बुद्ध इंटरनॅशनल सर्किटची चर्चा झाली. रशियातील सोच्ची आणि ऑस्ट्रियात एफ-1 रेसचे आयोजन करण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. यात भारताची संधी हुकण्याची दाट शक्यता आहे.