आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Gurinder Singh Sandhu Debut For Australia

भारतीय टॅक्सी ड्रायव्हरच्या मुलाने घेतला भारताचाच पहिला बळी, ऑस्ट्रेलियाकडून पदार्पण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय वंशाचा ऑस्ट्रेलियन क्रिकेटर गुरविंदर संधूने तिरंगी मालिकेत भारताविरोधात खेळाताना कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली आहे. ऑस्ट्रेलिया संघाने फिरकीपटू झेव्हियर डोहर्तीला विश्रांती देत 21 वर्षीय संधूला संधी दिली आहे. ऑस्ट्रेलियाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात खेळणारा तो 206 वा खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियाकडून खेळणारा तो पहिला भारतीय आहे.
पंजाबी कुटुंबातील गुरुविंदर, वडील ऑस्ट्रेलियात चालवतात टॅक्सी
मुळचे पंजाबचे रहिवासी असलेले गुरुविंदर संधूचे वडील इकबाल 80 च्या दशकात ऑस्ट्रेलियात आले. त्यांनी येथे ट्रक्सी ड्रायव्हरचे काम केले आणि गुरुविंदरची क्रिकेटची आवड जोपासली. त्यांनी त्याच्या शिक्षण आणि क्रिकेटच्या पॅशनमध्ये कधीही काही कमी पडू दिले नाही. सहा फूट पाच इंच उंची असलेल्या गुरुविंदरचा चेंडू चांगला उसळी घेतो. दोन्ही बाजूने स्विंग करण्याची कला त्याला अवगत आहे.
स्टीव्ह वॉ पुरस्काराने सन्मानित
गुरुविंदरने 2012-13 मध्ये प्रथमश्रेणी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीपासून त्याचा रेकॉर्ड चांगला राहिला आहे. त्याने न्यू साऊथ वेल्स टीमकडून खेळत असताना सर्वोत्कृष्ट खेळाडूचे 'स्टीव्ह वॉ मेडल' जिंकले होते. बिग बॅश लीगमध्येही त्याने शानदार कामगिरी केली होती.
पाँटिंगकडून कौतूक
मुळचा पंजाबी असलेल्या आणि साउथ वेल्स येथे जन्मलेल्या गुरुविंदरचे रिकी पाँटिंगने कौतूक केले आहे. तो म्हणाला होता, मर्यादित षटकांच्या खेळात ऑस्ट्रेलियासाठी हा उत्तम गोलंदाज ठरू शकतो.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, भारतीय वंशाच्या पहिल्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरची निवडक छायाचित्रे आणि रोचक माहिती