आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Has Chance For World Cup, Qulify Round Play On 12th March In Guwahati

भारताला वर्ल्डकपची संधी, पात्रता फेरीचा सामना १२ मार्च रोजी गुवाहाटीत रंगणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फिफाच्या आगामी २०१८ विश्वचषक आणि २०१९ एएफसी आशिया चषक स्पर्धेत खेळण्याची भारतीय फुटबॉल संघाला संधी आहे. मात्र, त्यासाठी भारतीय संघाला पात्रता फेरीतील सामन्यात उल्लेखनीय कामगिरी करावी लागेल. प्रारंभिक सत्रात संयुक्त पात्रतेसाठी घरच्या मैदानावर एक व एक सामना विदेशात खेळावा लागेल. भारताचे दोन सामने होणार आहेत. पहिला सामना १२ मार्च रोजी गुवाहाटीच्या मैदानावर रंगणार आहे. यासह भारताला घरच्या मैदानावर चमकदार कामगिरी करण्याची संधी आहे. त्यानंतर १७ मार्च रोजी विदेशात दुसरा होईल.

प्रशिक्षक स्टिफन कान्सटेनटाइन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय फुटबॉल संघ या पात्रता फेरीच्या सामन्यात खेळणार आहे. यात या फेरीत आशियाईतील सर्वात कमी रँकिंग असलेल्या १२ संघांचा समावेश आहे. यात भारतासह श्रीलंका, येमेन, कंबोडिया, चिनी ताइपै, तिमोर, नेपाळ, मकाऊ, पाकिस्तान, मंगोलिया, ब्रुनेई, भूतानचा समावेश आहे. यातील विजेत्या सहा संघांना दुस-या फेरीत प्रवेश मिळेल. या विजेत्या संघाचे दुस-या फेरीत क्रमवारीतील अव्वल ३४ संघांविरुद्ध सामने होतील. या ४० संघांची एकूण आठ गटांत विभागणी केली जाईल. पात्रतेच्या दुस-या फेरीला ११ जूनपासून प्रारंभ होणार आहे.

भारत-नेपाळ सामना
विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या पहिल्या पात्रता फेरीतील दोन सामन्यांत भारताला घरच्या मैदानावर नेपाळविरुद्ध खेळावे लागेल. येत्या १२ मार्च रोजी गुवाहाटीच्या मैदानावर हा सामना होईल. त्यानंतर १७ मार्च रोजी भारतीय संघाला नेपाळमध्ये खेळावे लागेल. दोन वर्षांनंतर दोन्ही संघ समोरासमोर येत आहेत. या वेळी भारताने नेपाळवर २-० ने मात केली होती.