आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुडबाय 2013 : भारतीय हॉकीसाठी सरते वर्ष ठरले चढ-उताराचे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - प्रदीर्घ काळापासून असलेली भारतीय हॉकीच्या लीगची प्रतीक्षा अखेर 2013 मध्ये संपुष्टात आली. युवा संघातील खेळाडूंची रोलर कोस्टरसारखी झालेली कामगिरी, महिलांनी पुरुष हॉकीपटूंपेक्षा केलेली सरस कामगिरी आणि हॉकी प्रशिक्षकांच्या बदलाने बदललेली परिस्थिती अशा प्रकारे भारतीय हॉकीसाठी सरते वर्ष प्रचंड चढ-उताराचे ठरले.
र्जमनीतील ज्युनियर महिला हॉकी विश्वचषकात भारतीय मुलींनी थेट कांस्यपदकापर्यंत धडक मारत हॉकीप्रेमींना आश्चर्यचकित केले. भारतीय मुलींनी 2013 मध्ये केलेली ही कामगिरीच भारतीय हॉकीसाठीची गतवर्षातील सर्वोत्तम घटना ठरली. इंग्लंडच्या संघाला पेनल्टी शूटआऊटमध्ये मात देत कर्णधार सुशीला चानूच्या नेतृत्वाखालील मुलींच्या भारतीय संघाने स्पर्धेवर ठसा उमटवला.
मात्र पुरुषांच्या हॉकीत भारताला केवळ भारतीय उपखंडातच चमक दाखवता आली. केवळ आशिया चषकात कांस्य आणि एशियन चॅम्पियनशिपमध्ये रौप्यपदक हीच त्यांची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
युवा हॉकीपटूंची कामगिरी सी-सॉसारखी
ज्युनियर मुलींप्रमाणेच भारतीय युवा संघातील हॉकीपटूंनी वर्षाच्या प्रारंभी आश्चर्याचा सुखद धक्का दिला. वर्षाच्या प्रारंभीच त्यांनी मलेशियातील जोहोर चषकाचे विजेतेपद पटकावले. मात्र, ती लय त्यांना वर्षअखेरपर्यंत कायम राखता आली नाही. मनप्रीतसिंगच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ भारतात झालेल्या ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये साखळीतच बाद झाला.
वरिष्ठ संघातही सातत्याचा अभाव
वर्षाच्या प्रारंभी झालेल्या सामन्यांमध्ये भारतीय संघाने सलग सहा सामने जिंकून आशा निर्माण केली होती. रोटरडॅममध्ये झालेल्या स्पर्धेत पहिल्या तीन संघांत स्थान मिळवणे भारतीय हॉकीपटूंना न जमल्याने हॉकी वर्ल्ड कपमधील थेट प्रवेशाची संधी लांबणीवर पडली. त्यानंतर आशियाई खंडातील चॅम्पियन्स स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतावर कोरियाने मात केल्याने ती संधीदेखील भारताला गमवावी लागली. मात्र आशिया चषकात कोरियाने केलेला पाकचा पराभव आणि ओशिआनात ऑस्ट्रेलियाने विजेतेपद पटकावल्याने भारताचे हॉलंडमधील हेग येथे होणार्‍या विश्वचषकातील स्थान निश्चित झाले आहे.