आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Hockey May Pull Out Of CWG 2014 News In Marathi

राष्ट्रकुल स्पर्धेतून हॉकी संघाची माघार?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - हॉकीच्या संभावित संघातील खेळाडू हरबिंदरसिंग संधूने अधिस्वीकृती तयार करण्यात हयगय केल्याने संतप्त झालेले हॉकी इंडियाचे सरचिटणीस नरेंद्र बत्रा यांनी येत्या राष्ट्रकुल स्पर्धेतून भारतीय संघ माघार घेऊ शकेल, असा इशारा दिला आहे.

हॉकी इंडिया आणि इंडियन ऑलिम्पिक असोसिएशनमधील हा काही पहिलाच वाद नाही. मात्र, यावेळच्या वादामुळे भारतापुढे गंभीर पेच निर्माण झाला आहे. स्कॉटलंडच्या ग्लासगो येथे होणार असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या 28 संभावित भारतीय खेळाडूंमध्ये हरबिंदरसिंगची निवड करण्यात आली होती. मात्र, याबाबत कोणतेही कारण न देता हरबिंदरसिंगची अधिस्वीकृती नाकारण्यात आल्याने बत्रा संतप्त झाले. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष एन. रामचंद्रन आणि सरचिटणीस राजीव मेहता यांना याबाबत 5 फेबु्रवारीलाच कल्पना देण्यात येऊनही त्यांनी पुढे कोणतीच कार्यवाही केली नसल्याने बत्रा यांनी हा इशारा दिला आहे. त्यांच्या पदाधिकार्‍यांच्या अधिस्वीकृतीची त्यांनी पुरेपूर काळजी घेतली, मात्र खेळाडूंच्या बाबतीत हयगय केल्याचा आरोपही या वेळी बत्रा यांनी केला आहे.

यूकेने केलेल्या तपासणीनुसार
या कार्यक्रमाचे व्यवस्थापक रॉबर्ट व्हर्गाव यांनी हरबिंदरची अधिस्वीकृती रद्द करण्यात आल्याबाबत कारण दिले असल्याचे म्हटले आहे. इंग्लंडच्या (यूके) पदाधिकार्‍यांनी केलेल्या काही तपासण्यांमध्ये त्रुटी आढळल्याने त्याची अधिस्वीकृती नाकारण्यात आल्याचे कळवले आहे.