आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय हॉकी टीम करणार हॉलंडचा दौरा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची - येत्या 31 मेपासून विश्वचषक हॉकी स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या तयारीसाठी आठ वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन भारतीय संघ 11 ते 19 एप्रिलदरम्यान, हॉलंडचा दौरा करणार आहे. त्यामुळे भारतीय संघाने या दरम्यान, होणार्‍या अझलान शाह हॉकी स्पर्धेत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. ही स्पर्धा 12 ते 23 मार्चदरम्यान, मलेशियात होणार आहे.

‘भारतीय हॉकी संघ नऊ दिवसांच्या हॉलंड दौर्‍यात वल्र्डकपसाठी कसून सराव करणार आहे. या दौर्‍यात भारताचे यजमान टीमसोबत सहापेक्षा अधिक सामने आयोजित करण्यात आले. भारतासाठी ही स्पर्धा प्रतिष्ठेची आहे,’अशी प्रतिक्रिया टीमचे हाय परफॉर्मन्स संचालक रोलेंट ओल्टमेंस यांनी दिली. हॉलंडच्या हेग येथे भारत आणि यजमान संघ यांच्यात सराव सामन्यांचे आयोजन करण्यात येईल. या सामन्यातून भारताला कामगिरीचा दर्जा उंचावण्याची संधी आहे.