इंचियोन - पुरुष आणि महिला हॉकी संघाला वेगाने पछाडले आहे. दोन्ही संघ वेगवान पासिंगवर कठोर मेहनत घेत आहेत. पुरुष संघाचा स्ट्रायकर एस. व्ही. सुनील आणि महिला संघाची मिडफील्डर नवज्योत कौर यांनी ही माहिती िदली. महिला संघ आशियाई स्पर्धेसाठी पूर्ण जोमाने तयार आहे. या स्पर्धेत चांगल्या कामगिरीचा विश्वास नवज्योतने व्यक्त केला. थायलंडशी त्यांचा सलामीचा सामना होणार आहे, तर पुरुषांना २१ सप्टेंबरला श्रीलंकेशी दोन हात करायचे आहेत.
विरोधी संघाला पूर्णवेळ दबावात ठेवण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी जास्तीत जास्त गोल करावे लागतील. आम्ही एका विशिष्ट पद्धतीने खेळ करणार आहोत. वेगवान पासिंगमुळे तसेच फॉरवर्ड लाइनवर जास्तीत जास्त संधी निर्माण कराव्या लागतील. आमचे सध्याचे प्रशिक्षण सत्रही याच सरावाभोवती केंद्रित आहे, असे यावेळी सुनीलने म्हटले.