आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय महिला हॉकी संघ आठव्या स्थानी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्लासगावो - सलगच्या पराभवामुळे भारतीय महिला संघाचे चॅम्पियन्स चॅलेंज-1 हॉकी स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. भारतीय संघाला पराभवामुळे आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. भारताला रविवारी स्कॉटलंडने 4-3 अशा फरकाने पराभूत केले.
दुसर्‍या हाफमध्ये विक्की बुन्सने (44 मि.) यजमान टीमकडून गोलचे खाते उघडले. त्यानंतर नेहा गोयलने (46 मि.) गोल करून भारताला 1-1 ने बरोबरी मिळवून दिली. दरम्यान, लिलिमा मिन्झ (51मि.) आणि नवनीत कौरने (63 मि.)एक गोल करून भारताला 3-1 ने आघाडी मिळवून दिली. मात्र, अलिसा (64 मि.), विक्की (67 मि.) आणि क्लेमेंटने (68 मि.) गोल करून यजमानांचा विजय निश्चित केला.