आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय हॉकी टीम दुसर्‍या वर्ल्डकपच्या प्रतीक्षेत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हेग - सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दुसर्‍यांदा विश्वचषक जिंकण्याच्या प्रतीक्षेत आहे. येत्या 31 मे रोजी 13 व्या विश्वचषक हॉकी स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्याला अद्याप चार दिवस शिल्लक आहेत. या स्पर्धेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरचे दिग्गज संघ सज्ज झाले आहेत. तसेच ऑस्ट्रेलिया यंदाही विश्वचषकावरचे आपले वर्चस्व कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहे.
स्पर्धेचा उद्घाटनीय सामना गतविजेता ऑस्ट्रेलिया आणि मलेशिया यांच्यात रंगणार आहे. तसेच याच दिवशी भारताचा सामना बेल्जियमशी होणार आहे.
1975 पासून वर्ल्डकपची आशा!
भारतीय संघाला 1975 पासून आजतागायत एकदाही विश्वचषकावर नाव कोरता आले नाही. आता कर्णधार सरदारा सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ वर्ल्डकपचा हा तीन दशकांचा दुष्काळ दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे. बेल्जियमविरुद्ध सामन्यातील दमदार विजयाने भारतीय संघाला स्पर्धेत चांगली सुरुवात करण्याची संधी आहे. यासाठी भारतीय संघाने कसून सरावावर भर दिला आहे.
मजबूत डावपेच आखले
‘आम्ही वर्ल्डकपच्या तयारीसाठी जोरदार सराव करत आहोत. काही कच्चे दुवे दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच डिफेन्स मजबूत करण्यावरही आम्ही अधिक भर देत आहोत,’ अशी प्रतिक्रिया हाय परफॉर्मन्स निदेशक रोलेंट ओल्टमेन्स यांनी दिली.
पाकच्या नावे चार किताब
पाकिस्तानने आतापर्यंत चार वेळा किताब पटकावला आहे. या टीमने आतापर्यंत 12 वेळा विश्वचषक स्पर्धेत सहभाग घेतला होता. या टीमने आतापर्यंत चार वेळा ही स्पर्धा जिंकली.