आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Hokey Team Win Gold Medal In Asian Games, Latest News In Marathi

ASIAD: भारतीय हॉकी संघाने लुटले दस-याचे सोने, पाकिस्तानला 4-2 ने लोळवत ऑलिम्पिकसाठी पात्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अंतीम लढत जिंकल्‍यानंतर आनंद व्‍यक्‍त करताना भारतीय खेळाडू)
इंचियोन – आशिया खंडातील दोन दिग्गज आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्‍यामध्‍ये आज (गुरुवारी) झालेल्‍या पुरुष हॉकीमध्‍ये भारताने सुवर्ण पदकावर नाव कोरले. भारताने पाकिस्‍तानला 4-2 असे हरवून रिओ येथे होणा-या ऑलिम्पिकची पात्रताही पूर्ण केली आहे.
34 वर्षांनंतर भारताने आशियाई स्‍पर्धेत पाकिस्‍तानला धूळ चारली आहे. निर्धारीत 60 मिनिटांच्‍या सामन्‍यामध्‍ये 1-1 अशी बरोबरी असताना सामना शुटआउटमध्‍ये पोहोचला. त्‍यामध्‍ये भारताने 4-2 अशी बाजी मारली.
भारतासाठी गुरविंदर सिंह चंडी, रूपिंदर पाल सिंह बीरेंद्र लाकरा आणि धर्मवीर सिंह यांनी गोल केले. तर पाकिस्तानचे मोहम्मद वकास आणि शफकत रसूलच गोल करु शकले.
आशियाई स्‍पर्धेत भारताने यापूर्वी 1998 मध्‍ये सुवर्ण पदक जिंकले होते. यावर्षी यजमान द. कोरियाला 1-0 ने पराभूत करून भारताने फायनलमध्ये धडक दिली होती. तर दुसरीकडे गतचॅम्पियन पाकिस्तानने पेनल्टी शूटआऊटवर मलेशियाला 6-5 ने पराभूत केले होते. भारत आणि पाकिस्तान तब्बल 24 वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर आशियाई खेळामध्‍ये अंतीम सामन्‍यात समोरासमोर आली होती. दोन्ही संघ अखेरीस 1990 मध्ये बीजिंग येथे भरलेल्‍या आशियाई स्‍पर्धेच्‍या फायनलमध्ये समोरासमोर आले होते. त्या वेळी पाकिस्तान विजेता ठरला होता.
रिलेमध्‍येही मिळाले सुवर्ण
हॉकीमध्‍ये सुवर्ण का‍मगिरी करण्‍याच्‍या काही अवधीपूर्वीच भारताच्‍या 4x100 मीटर रिलेमध्ये भारतीय महिला संघाने सुवर्ण पदक मिळविले. प्रियंका पवार, टिंटू लूका, मंदीप कौर आणि एमपी राजू यांनी 3 मिनिट 28.68 सेकंदमध्‍ये शर्यत पूर्ण करत जपान आणि चीनला मात दिली. जपानला रौप्‍य तर चीनला कांस्‍य पदकावर समाधान मानावे लागले.
पदक तालिकेत भारत
रँक
सुवर्ण
रौप्‍य
कांस्‍य
एकूण
9
9
9
35
53
पुढील स्‍लाइडवर पाहा, आशियाई खेळातील भारताची ताजी छायाचित्रे...