आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Kabbadi Team Won In Asian Games, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय पुरुष कबड्डी संघ विजयी, दुसरा विजयाची नोंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - सहा वेळचा चॅम्पियन भारतीय पुरुष कबड्डी संघाने आशियाई स्पर्धेतील दबदबा कायम ठेवताना सोमवारी सलग दुस-या विजयाची नोंद केली. भारताने स्पर्धेतील आपल्या दुस-या सामन्यात थायलंडचा ६६-२७ ने पराभव केला.

यापूर्वी सलामीच्या लढतीत भारतीय संघाने बांगलादेशला धूळ चारली होती. भारतीय संघाने दमदार सुरुवात करताना पहिल्या हाफमध्ये २९-१५ अशा फरकाने आघाडी मिळवली होती. त्यानंतर भारताने दुस-या हाफमध्येही सामन्यावरची पकड अधिक घट्ट केली. त्यामुळे भारताला आपला विजय निश्चित करता आला.

भारत-पाक आज समोरासमोर
आशियाई स्पर्धेच्या कबड्डीत भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी मंगळवारी समोरासमोर असणार आहेत. भारताने सलगच्या दोन विजयांसह ब गटात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. दुसरीकडे पाकचा संघही फॉर्मात आहे. त्यामुळे ही लढत अधिक रंगतदार होण्याची शक्यता आहे. या सामन्याची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे.