आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Olympic Organization Get 31 October Deadline

31 ऑक्टोबरपर्यंतची भारतीय ऑलिम्पिक संघटनेला डेडलाइन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) 31 ऑक्टोबरपर्यंत कलंकित अधिका-यांना हटवण्याची भारतीय ऑलिम्पिक संघाला (आयओए) डेड लाईन दिली आहे. या निर्धारित वेळेत कलंकित अधिका-यांना हटवले नाही तर भारताचे निलंबन कायम राहील, अशा स्पष्ट शब्दांत आयओसीने ताकिद दिली.


भारतीय ऑलिम्पिक संघाकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयओसीने 15 डिसेंबरपर्यंत निवडणूक घेण्यास सांगितले आहे. हे निर्देश पाळले नाही तर भारताचा ऑलिम्पिक प्रवेश अशक्य असेल. आपल्या आरोपपत्रांसंबंधीच्या अटींवर आयओसी ठाम आहे. भारतीय ऑलिम्पिक संघाला स्वच्छ कारभारासाठी ही अट स्वीकारावीच लागेल, असे आयओसीने स्पष्ट केले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत भारतीय ऑलिम्पिक संघाने आयओसीसमोर तडजोडीचा प्रस्ताव ठेवून आरोप असलेल्यांना निवडणूक लढवण्याची सूट मागितली होती. आयओएच्या प्रस्तावानुसार, दोन वर्षांहून अधिक काळ तुरुंगात राहिलेल्या अधिका-यांनाच हा नियम लागू व्हायला पाहिजे. मात्र, आयओसी आपल्या पवित्र्यावर ठाम आहे.