आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Premier League 2014 Latest Dhoni News In Marathi

18 एप्रिल रोजी विक्रमवीर ठरणार सुरेश रैना?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन प्रीमियर लीगचे सातवे पर्व अवघ्‍या चार दिवसांवर येवून ठेपले आहे. या IPL मध्‍ये भारतीय क्रिकेटपटू विक्रमी खेळी करु शकतात. विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा या फलंदाजांवर सर्वांच्‍या नजारा लागल्‍या आहेत.

मुंबई इंडियन्‍स आणि चेन्‍नई सुपरकिंग्‍जचे संघ दुबईला पोहोचले आहेत. स्‍पर्धेतील पहिला सामना 16 एप्रिल रोजी होणार असून मुंबई इंडियन्‍स विरुध्‍द कोलकाता नाईट रायडर्स विरध्‍द खेळल्‍या जाणार आहे.

या पर्वामध्‍ये शतकी सामने खेळू शकणारे खेळाडू

सुरेश रैना (चेन्नई सुपरकिंग्स) - 99 मॅच
महेंद्र सिंह धोनी (चेन्नई सुपरकिंग्स) - 96 मॅच
विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळूर) - 93 मॅच
हरभजन सिंह (मुंबई इंडियंस) - 82 मॅच

आयपीएल मध्‍ये सर्वाधीक सामने खेळणारे खेळाडू
सुरेश रैना - 99 मैच
रोहित शर्मा - 97 मॅच
महेंद्र सिंह धोनी - 96 मॅच
एस बद्रीनाथ - 95 मॅच (यावर्षीपासून खेळणार नाही)
विराट कोहली - 93 मॅच
दिनेश कार्तिक - 92 मॅच
यूसुफ पठान - 91 मॅच
रॉबिन उत्थप्पा - 91 मॅच
जैक कॅलिस - 90 मॅच
राहुल द्रविड़ - 89 मॅच (यावर्षीपासून नाही खेळणार)


आयपीएलमध्ये सुरेश रैना
2008 (421 धावा) 2009 (434 धावा) 2010 (520 धावा) 2011 (438 धावा) 2012 (441 धावा) 2013 (548 धावा)

रैनाचे सामन्यांचे ‘शतक’ ! रैनाला 3 हजार धावांसाठी अवघ्या 198 ची आवश्यकता आहे. यासह तो तीन हजार धावांचा पल्ला गाठणारा पहिला खेळाडू ठरेल. रैना 18 एप्रिल रोजी किंग्ज इलेव्हनविरुद्ध लढतीत सामन्यांचे ‘शतक’ही पूर्ण करणार आहे.

2013 च्या आयपीएल सत्रात 16 सामन्यांत एकूण 634 धावा काढणारा 25 वर्षीय कोहली चाहत्यांच्या हृदयातील ताईत बनला. कसोटीपाठोपाठ वनडे आणि आता टी-20 क्रिकेटमध्येही तो यशस्वी ठरला आहे.