आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Premier League 2014 Records And Stats In Marathi

IPL-7 चे महापर्व आजपासून; जाणून घ्या, टूर्नामेंटमधील 10 RECORDS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बहुचर्चित इंडियन प्रीमिअर लीग अर्थात 'आयपीएल'च्या सातव्या पर्वाला आजपासून (बुधवार) प्रारंभ होत आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि माजी विजेता कोलकाता नाइटरायडर्स यांच्या लढतीने टूर्नामेंटचा श्रीगणेशा होणार आहे. यंदा लोकसभा निवडणुकीमुळे आयपीएलचा पहिला टप्पा संयुक्त अरब अमिरातमध्ये(यूएई) खेळला जाणार आहे. कोलकात्याचा संघ गौतम गंभीर तर मुंबईचा संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात आपले कसब आजमाताना दिसत आहे.
युवीसंग 'गंगनम' करणार ख्रिस गेल...
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा स्टार फलंदाज ख्रिस गेल टीम इंडियाचा ऑलराउंडर युवराज सिंहसोबत फलंजादी करण्‍यासाठी उत्सूक आहे. गेल म्हणाला, 'काही आंतराष्ट्रीय स्टार क्रिकेटपटूंसोबत ड्रेसिंग रुम शेअर करण्यावरून मी खूप उत्साहीत आहे. युवराज एक महान क्रिकेटपटू आहे. त्याच्यासोबत खेळताना गंगनम स्टाइल डान्स करण्याची माझी इच्छा आहे.'
यंदा युवराजला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 14 कोटी रुपये मानधनावर घेतले आहे. युवी गेलसोबत मैदानात उतरणार आहे.
नवा विक्रम बनेल..
गेल्या पर्वात रॉयल चॅलेंजर्सचा फलंदाज ख्रिस गेल याने शानदार 175 धावांची दमदार खेळी करून नवा विक्रम प्रस्थापित केला होता. गेल हा छटकार लगावण्यात माहीर असून युवीने एका षटकात सलग सहा षटकार ठोकून विश्वविक्रम केला आहे. यंदा हे दोन्ही आक्रमक फलंदाज काय जादू दाखवतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
पुढील स्लाइड्‍सवर वाचा, आयपीएलशी निगडीत 10 फॅक्ट्‍स...