आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Premiere League 2014 Opening Match Mumbai Vs KKR News In Marathi

आयपीएलचा धुमधडाका 16 एप्रिलपासून, पहिला सामना KKR विरुद्ध MI मध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंडियन प्रिमीयर लीगच्या (आयपीएल) सातव्या पर्वांच्या सामन्यांचे वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले आहे. 16 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान शारजा, अबु धाबी आणि दुबईमध्ये आयपीएल-7 च्या पहिल्या टप्प्यातील सामने खेळवले जाणार आहेत. येथे 20 सामने होतील.

आयपीएल-7 चा सलामीचा सामना 16 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात अबु धाबी येथे होणार आहे.
आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सामने 16 ते 30 एप्रिल दरम्यान युएईमध्ये खेळविले जाणार आहेत. येथे 20 सामने होतील.
1 ते 12 मे दरम्यान ज्या शहरांमध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठीचा कार्यक्रम संपला आहे, तिथे सामने खेळण्यास आयपीएल गव्हर्निंग काँसिलला परवानगी मिळावी, अशी विनंती बीसीसीआयने केंद्रीय गृहमंत्रालयाला केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिली नाही तर, या काळातील सामने बांगलादेशात होणार आहेत.
13 मे नंतरचे आयपीएलचे सर्व सामने मात्र भारतातच होणार आहेत. गव्हर्निंग काँसिलने 16 मे रोजी एकही सामना ठेवलेला नाही.

पुढील स्लाइडमध्ये, UAE मध्ये होणा-या सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक