चंगवान, कोरिया - विश्वचषकामध्ये अपूर्वी चंदेलाने पिस्तूल शूटिंगमध्ये कांस्यपदकाची कमाई करीत रिओ ऑलिम्पिकसाठी स्थान नक्की केले. जितू रायनंतर ऑलिम्पिक पथकात स्थान मिळवणारी ती दुसरी नेमबाज ठरली.
अपूर्वीने एकूण १८५.६ गुणांची कमाई करीत तृतीय क्रमांक पटकावला. क्रोएशियाच्या पेजेइक स्नेजवानाने सुवर्ण तर सर्बियाच्या इवाना मॅक्सिमोवीकने रौप्यपदक पटकावले. मात्र, महाराष्ट्राची राही सरनोबत, अनिसा सय्यदसह प्रकाश नानजप्पा, राजसिंग अपयशी ठरले.
अभूतपूर्व नेम
अपूर्वीने आत्मविश्वासाने केलेल्या खेळामुळे तिला थेट कांस्यपदकावर नाव कोरता आले. विश्वचषकात पदक कमावणे हे माझे खूप काळापासूनचे लक्ष्य होते. ऑलिम्पिक प्रवेशही झाला असल्याचे, तिने म्हटले.