आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही पैलवान करणार नोव्हेंबरमध्ये लग्न, प्रियकराने असे पटवले तिच्या घरच्यांना!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतीय महिला कुस्तीची आयकॉन व ऑलिंपियन पैलवान गीता फोगट यावर्षी नोव्हेंबरमध्ये विवाह करणार आहे. - Divya Marathi
भारतीय महिला कुस्तीची आयकॉन व ऑलिंपियन पैलवान गीता फोगट यावर्षी नोव्हेंबरमध्ये विवाह करणार आहे.
सोनीपत- भारतीय महिला कुस्तीची आयकॉन व ऑलिंपियन पैलवान गीता फोगट यावर्षी नोव्हेंबरमध्ये विवाह करणार आहे. तिने आपल्या खेळातील साथीदार निवडला आहे. पैलवान पवन कुमार असे त्याचे नाव असून त्याने 2010 कॉमनवेल्थ गेम्समध्ये 86 किलो वजनी गटात ब्राँझ मेडल जिंकले होते. पैलवान पवनकुमारसोबत विवाह करीत असल्याची माहिती खुद्द गीता व पवनने divyamarathi.com ला दिली. असे पडले एकमेंकांच्या प्रेमात....
- गीताने सांगितले की, सुमारे वर्षभरापूर्वी एका कुस्ती स्पर्धेत दोघांची भेट झाली व चर्चाही झाली. त्यानंतर गीता पवनला आवडू लागली.
- यानंतर दिल्लीतील नांगल ठाकरान निवासी पवन नेच गीताच्या फॅमिलीला लग्नासाठी तयार केले, पटवले.
- कॉमनवेल्थ गेम्समध्ये 55 किलो वजनी गटात गोल्ड मेडल जिंकणा-या गीताने आपल्या हातावर पवनच्या नावाचा टॅटू काढला आहे.
ब्वॉयफ्रेंडचे स्टेटस- आय लव्ह यू गीत
- गीता म्हणाली, पवनने आपले स्टेट्समध्ये ‘आय लव्ह यू गीत’ असे लिहले आहे.
- ऑलिंपिकनंतर होणा-या कॉमनवेल्थ गेम्सची तयारी करीत असलेला पवन म्हणाला, की ‘आम्ही दोघेही पैलवान आहे. त्यामुळे एकमेंकाना समजून घेतो.'
- आपल्याला माहित असेलच की, गीता आता भारतीय खेळ प्राधिकरणात (साई) उत्तर भागाचे केंद्र बहालगड येथे बहिण बबीता विनेशसोबत इतर काही महिला पैलवानांना रिओ ऑलिंपिकसाठी मार्गदर्शन करीत आहे.
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, गीता आणि पवनचे फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...