आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Super League Football Compition Opening, Divya Marathi

इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटनाला रंगारंग कार्यक्रमाची ‘किक’!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - सिनेअभिनेत्यांच्या खास उपस्थितीत आयोजित रंगारंग कार्यक्रमाने पहिल्या सत्रातील इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. येत्या १२ ऑक्टोबरपासून या पहिल्या सत्रातील लीगला प्रारंभ होईल. या वेळी ४५ मिनिटांचा उद्घाटन सोहळा रंगणार आहे. सायंकाळी पाच वाजेपासून या सोहळ्याला सुरुवात होईल. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. कोलकात्याच्या विवेकानंद युवा भारतीय क्रीडांगणावर हा सोहळा आयोजित करण्यात आला.

या वेळी सिनेअभिनेत्री प्रियंका चोप्रासह वरुण धवन उपस्थित राहतील. आयएमजी रिलायन्स आणि स्टार इंडियाच्या संयुक्त विद्यमाने ही लीग आयोजित करण्यात आली. या लीगमध्ये सचिन, धोनीसह सिनेभिनेता जॉन अब्राहम, अभिषेक बच्चनचे संघ सहभागी होणार आहेत.

५०० कलाकार
उद्घाटन सोहळ्यातील सांस्कृतिक कार्यक्रमात प्रियंका व वरुण धवन नृत्याविष्कार सादर करतील. यात सहभागी झालेले ५०० कलाकार विविध प्रकारचे नृत्य करणार आहेत.

सचिन, बिग बी उपस्थित
या सोहळ्याला क्रिकेट, सिनेमा, व्यवसाय क्षेत्रातील बिग बी अमिताभ बच्चन, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसह मुकेश अंबानी उपस्थित राहणार आहेत.