कोलकाता - पुणे एफसी संघाला शुक्रवारी इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत यजमान अॅथलेटिको डी कोलकात्याच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. दुसरीकडे यजमान संघाचा घरच्या मैदानावर लीगमध्ये विजयी चौकार मारण्याचा प्रयत्न असेल. सलगच्या विजयासह कोलकाता संघ आयएसएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. ‘दादा’ सौरव गांगुलीच्या कोलकाता संघाने शानदार विजयाने लीगमध्ये
आपला दबदबा निर्माण केला आहे.
जेर्मानी पेन्नेटकडून आशा
आर्सेनल व लिव्हरपूलचा माजी खेळाडू जेर्मानी पेन्नेटकडून पुणे संघाला चमकदार कामगिरीची आशा आहे. पुणे संघाने गुरुवारी त्याच्याशी करार केला. तो आता ओमार आंद्रेसच्या जागी लीगमध्ये खेळणार आहे. वयाच्या १५ व्या वर्षी जेर्मानीने आर्सेनल क्लबकडून खेळण्यास सुरुवात केली होती.