(फोटो: आयएसएलचा पहिलाच सामना
कोलकाता आणि
मुंबई यांच्यादरम्यान होणार आहे. सराव करताना खेळाडू)
आयपीएलच्या धर्तीवर आयोजित ‘इंडियन सुपर लीग’ (आयसएल) फुटबॉल स्पर्धेला आज (रविवार) पासून प्रारंभ होत आहे. स्पर्धेतील आठ संघ आठ कोटी रुपयांच्या किताबासाठी लढणार आहेत. या लीगमधील पहिलाच सामना सायं. 7 वाजता एटलेटिको द कोलकाता आणि मुंबई सिटी एफसी यांच्यामध्ये खेळल्या जाणार आहे.
काय आहे आयएसएल?
आयएसएल यानी इंडियन सुपर लीग फुटबॉल टूर्नामेंटला आयएमजी-रिलायंस (आयएमजी आणि रिलायंस इंडस्ट्रीज यांच्यामधील संयुक्त उपक्रम) आणि स्टार इंडियाकडून प्रमोट केल्या जात आहे. आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन (AIFF) याल लीगला सपोर्ट देत आहे.
आयएसएलचे घोषवाक्य
कम ऑन, इंडिया! लेट्स फुटबॉल!
आयएसएल हेतू ?
भारताला फुटबॉल खेळात एक बलाढ्य देश बनविने. आणि 2026 च्या फीफा वर्ल्ड कप साठी पात्र बनविने.
किती संघ?
या स्पर्धेत 8 शहरांची फ्रेंचाइजी करणारे संघ आहेत. त्यामध्ये दिल्ली, गुवाहाटी, कोलकाता, मुंबई, पुणे, गोवा,
कोच्चि आणि चेन्नई
संघाचे नाव
दिल्ली डाइनामोस, नॉर्थईस्ट यूनाइटेड एफसी (गुवाहाटी), एटलेटिको द कोलकाता, मुंबई सिटी एफसी, एफसी पुणे सिटी, एफसी गोवा, केरला ब्लास्टर्स (कोच्चि) आणि चेन्नइयन एफसी
खेळाडू
या स्पर्धेमध्ये प्रत्येक फ्रेंचाइजीला कमितकमी 22 खिलाडूंपैकी 14 खेळाडू भारतीय असणार आहेत. सोबतच संघामध्ये एक एक मार्की प्लेयर (जो खेळाडू यूरोपियन चॅम्पियनशिप, कोपा अमेरिका किंवा आशिया कपमध्ये किंवा कॉन्टिनेंटल चॅम्पियनशिपमध्ये त्याने देशाचे प्रतिनिधित्व केले असा खेळाडू) आणि सात आंतरराष्ट्रीय खेळाडू असणार आहेत.
किती आहे बक्षिसाची रक्कम ?
टूर्नामेंट जिंकणा-या संघाला 8 कोटी रुपयांची रक्कम दिली जाणार आहे. दुस-या स्थानी असलेल्या संघाला 4 कोटी रुपये आणि सेमीफायनल खेळणा-या दोन्ही संघांना प्रत्येकी 1.5 कोटी रुपये दिले जाणार आहेत.
कोठे होणार सामने ?
दिल्ली: जवाहरलाल नेहरू स्टेडियम,
गुवाहाटी: इंदिरा गांधी स्टेडियम
कोलकाता: सॉल्ट लेक स्टेडियम
मुंबई: डीवाई पाटिल स्टेडियम
पुणे: शिव छत्रपति स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्टेडियम
गोवा: जवाहरलाल नेहरू स्टेडियम
कोच्चि: जवाहरलाल नेहरू स्टेडियम
चेन्नई: जवाहरलाल नेहरू स्टेडियम
संघाचे मालक
या चॅनलवरुन होणार प्रक्षेपण
सामन्यांचे थेट प्रसारण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या 8 चॅनलवरुन केले जाणार आहे. त्यामध्ये स्टार स्पोर्ट्स 2 (अंग्रेजी), स्टार स्पोर्ट्स 3 (हिंदी), स्टार स्पोर्ट्स एचडी 2 (इंग्रजी), स्टार गोल्ड (हिंदी), स्टार उत्सव (हिंदी), एशियानेट मूवीज (मल्याळम), जलशा मूवीज (बंगाली) आणि सुवर्ण प्लस (कन्नड़) वर दाखविल्या जाणार आहेत.
पुढील स्लाइडवर वाचा, टूर्नामेंटमधील सर्वांत महागड्या खेळाडूंविषयी..