आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Super League News In Marathi, Divya Marathi, Football Club Goa

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इंडियन सुपर लीग: 'फुटबॉल क्लब गोवा'ची मुंबईत घोषणा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘फुटबॉल क्लब गोवा' या इंडियन सुपर लीगमधील फुटबॉल संघाची घोषणा मंगळवारी मुंबई येथे करण्यात आली. या कार्यक्रमासाठी नीता अंबानी, व्हिडिओकॉन समूहाचे प्रमुख वेणुगोपाल धूत, साळगावकर समूहाचे व्यवस्थापकीय संचालक दत्तराज साळगावकर आणि डेंपो उद्योग समूहाचे श्रीनिवास डेंपो हजर होते. या कार्यक्रमात नीता अंबानी यांनी भारतातील क्रीडा जगताच्या भल्यासाठी कायम एक पाऊल पुढे राहण्याचे आमचे उद्दिष्ट असून त्यासाठीच फुटबॉल या खेळासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे सांगितले.

‘फुटबॉल क्लब गोवा’ या संघाचे मालक वेणुगोपाल धूत, दत्तराज साळगावकर आणि श्रीनिवास डेंपो यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. श्रीनिवास डेंपो यांनी सांगितले की, "साळगावकर आणि डेंपो उद्योग समूहाने मिळून गेली शंभर वर्षे गोव्यामध्ये फुटबॉल सांभाळला, जोपासला आणि वाढवला. म्हणूनच आम्ही या नवीन प्रकल्पामध्ये एकत्र आलो आहोत. यामुळे खेळ आणि खेळाडूंसोबतच खेळासाठी आवश्यक असणा-यासर्व बाबींचा विकास होईल.' या कार्यक्रमांमध्ये या संघाचे मुख्य प्रशिक्षक झिटो व प्रमुख खेळाडू रॉबर्ट फिअर्स यांना खास आमंत्रित केले होते. या वेळी क्रिकेटपटू विराट कोहली हजर होता. कोहली या संघाचा सहमालक असून, त्याने फुटबॉलच्या विकासासाठी प्रयत्नाचे आश्वासन दिले.

पटेल अनुपस्थित
ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल या कार्यक्रमास हजर राहणार होते, परंतु निवडणूक आयोगाने परवानगी नाकारल्याने ते या कार्यक्रमास हजर राहू शकले नाहीत, असे समजते.