(फोटो - सौरव गांगुली आणि प्रियंका चोप्रा)
कोलकाता - सॉल्टलेक स्टेडिअममध्ये भारतातील पहिल्या व्यावसायिक फुटबॉल लीग ‘ISL’ स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूडमधील दिग्गज तारकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन प्रियंका चोप्राने केले. संचालनामध्ये प्रियंकाने कोलकाता संघाचा मालक 'दादा' अर्थात सौरव गांगुलीची चांगलीच फिरकी घेतली.
प्रियंका चोप्राने वेधले चाहत्यांचे लक्ष
उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूड स्टार प्रियंका चोप्रा
आपल्या शानदार संचालन क्षमतेने वातावरण प्रफुल्लित केले. तिने सुरुवातीला शानदार डान्स करून प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर तिने आठही संघांचे मालक आणि सहमालकांसोबत त्या संघांच्या कर्णधारांचा उपस्थितांना परिचय करून दिला. उद्घाटन सोहळ्याचे संचालन सुप्रसिद्ध संगीतकार सलीम मर्चंट यांनी केले. सर्व आठ संघांचे दिग्गज मालक आणि हजारो चाहते सॉल्टलेक स्टेडियमवर उपस्थित होते.
'दादा' ची फिरकी
उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूड स्टार प्रियंका चोप्रा आपल्या शानदार संचालन क्षमतेने वातावरण प्रफुल्लित केले. तिने सुरुवातील कोलकाताच्या फुटबॉल प्रेमींना डिवचायला सुरुवात केली. त्यानंतर कोलकाताची तहान, भूक, आवड सर्वकाही फुटबॉल असल्याचे तिने म्हणताच स्टेडिअममध्ये टाळ्यांचा पाऊस पडला. संघ मालकांचा परिचय करुन देताना, गांगुलीला मैदानावर टी शर्ट काढण्याची आवड असून फुटबॉल या खेळात टी शर्ट काढण्याची परंपरा आहे. म्हणूनच गांगुलीने फुटबॉल संघ खरेदी केला असल्याचा हळूच चिमटा काढला. आणि गांगुलीपासून पळ काढला. हृतिककडे जाताच हृतिकने तिला उचलून घेतले.
70 दिवस चालणा-या फुटबॉल संग्रामचा प्रारंभ झाल्याची नीता अंबानी औपचारिक घोषणा केली. यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्य मंत्री ममता बनर्जी, रिलायंस ग्रुपच्या नीता अंबानी, फुटबॉल फेडरेशनने प्रमुख प्रफुल्ल पटेल, कोलकाता संघाचा मालक सौरव गांगुली , सचिन तेंडुलकर,
रणबीर कपूर,
जॉन अब्राहम, हृतिक रोशन,
अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि
हरभजन सिंग स्टेडियममध्ये उपस्थित होते.
पुढील स्लाइडवर पाहा, उद्घाटनीय समारंभाची छायाचित्रे...