आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयएसएलची रंगारंग सुरुवात, उद्‌घाटन सोहळ्यात प्रियंका चोप्राची धमाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - येथील सॉल्टलेक स्टेडियमवर रंगारंग सोहळ्याने भारतातील पहिली व्यावसायिक लीग "आयएसएल'ला सुरुवात झाली. याप्रसंगी क्रीडाजगत आणि बॉलीवूडचे अनेक तारे उपस्थित होते. स्पर्धेचे आयोजक आयएमजी-रिलायन्स स्टारच्या सीईओ नीता अंबानी यांनी लीग सुरू झाल्याची घोषणा केली. "कम ऑन इंडिया, लेटअस प्ले फुटबॉल..' असे या वेळी नीता अंबानी यांनी म्हटले. या घोषणेसह ७० दिवस चालणा-या या फुटबॉलच्या महासंग्रामाला सुरुवात झाली.

प्रियंका चोप्राने वेधले चाहत्यांचे लक्ष
उद्घाटन सोहळ्यात बॉलीवूड स्टार प्रियंका चोप्रा आपल्या शानदार संचालन क्षमतेने वातावरण प्रफुल्लित केले. तिने सुरुवातीला शानदार डान्स करून प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर तिने आठही संघांचे मालक आणि सहमालकांसोबत त्या संघांच्या कर्णधारांचा उपस्थितांना परिचय करून दिला. उद्घाटन सोहळ्याचे संचालन सुप्रसिद्ध संगीतकार सलीम मर्चंट यांनी केले. सर्व आठ संघांचे दिग्गज मालक आणि हजारो चाहते सॉल्टलेक स्टेडियमवर उपस्थित होते. स्पर्धेत अ‍ॅटलेटिको डी कोलकाता, चेन्नईयीन एफसी, दिल्ली डायनामोस, एफसी गोवा, एफसी पुणे सिटी, केरळ ब्लास्टर्स एफसी, मुंबई सिटी एफसी आणि नॉर्थईस्ट युनायटेड एफसी संघांनी सहभाग घेतला.

यांची प्रमुख उपस्थिती
कार्यक्रमाच्या प्रसंगी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उद्योजक मुकेश अंबानी, नीता अंबानी, अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, क्रिकेटपटू सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, रणबीर कपूर, जॉन अब्राहम, हृतिक रोशन, बीग बी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि टीम इंडियाचा गोलंदाज हरभजनसिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

ड्रमर्सने केले मंत्रमुग्ध
कार्यक्रमाच्या वेळी पहिला परफॉर्मन्स ८ फ्रँचायझींच्या ड्रमर्सचा होता. कोलकाता, गोवा, पुणे, दिल्लीच्या ड्रमर्सच्या तालावर प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

प्रियंकाचा सौरवला टोला
प्रियंका चोप्राने सौरव गांगुलीचा परिचय करून दिला त्या वेळी तिने त्याचा चिमटा काढला. दादाला टी-शर्ट काढायची सवय असल्याने त्याने आपला फुटबॉलचा संघ खरेदी केला आहे, असे प्रियंकाने म्हटले अन् ती दूर पळून गेली. सिनेभिनेता हृतिक रोशन स्टेजवर आला त्या वेळी त्याने प्रियंकाला हाताने उचलताच प्रेक्षकांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.

कोलकाता विजयी; मुंबईचा पराभव
सौरव गांगुलीच्या अ‍ॅथलेटिको डी कोलकाता संघाने पहिल्या सत्रातील इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेचा किताब जिंकण्याच्या मोहिमेला रविवारी धडाकेबाज विजयाने सुरुवात केली. या संघाने घरच्या मैदानावर स्पर्धेत शानदार विजयी सलामी दिली. यजमान कोलकाता संघाने सलामी सामन्यात रणबीर कपूरच्या मुंबई सिटी फुटबॉल क्लबचा ३-० अशा फरकाने पराभव केला. यासह कोलकाता संघाने आयएसएलला दमदार सुरुवात केली.

फिकरू लेम्मेनासा (२८ मि.), बोर्जा फर्नांडेज (६९ मि.) व आर्नल लिबर्टी (९२ मि.) यांनी केलेल्या प्रत्येकी एका गोलच्या बळावर कोलकाता संघाने सामना जिंकला. शेवटच्या मिनिटापर्यंत विजयासाठी मुंबई सिटी एफसीने दिलेली झुंज अपयशी ठरली. रहीम नबीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या मुंबई सिटीला सुमार खेळीमुळे या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईने खाते उघडण्याठी जोरदार प्रयत्न केले.

बोर्जा, फिकरू चमकले
कोलकाता संघाने मध्यंतरापूर्वी १-० ने आघाडी घेतली. फिकरूने २८ व्या मिनिटाला लढतीत यजमानांकडून गोलचे खाते उघडले. त्यानंतर ६९ व्या मिनिटाला बोर्जाने आणि मिळालेल्या अतिरिक्त वेळेत अर्नाल लिबर्टीने गोल केला.