आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Super League: Today Delhi Challenge Before Mumbai

इंडियन सुपर लीग: मुंबईसमोर आज दिल्लीचे आव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सिनेअभिनेता रणबीर कपूरचा मुंबई सिटी एफसी संघ इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत विजयी लय कायम ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. यजमान मुंबईसमोर बुधवारी दिल्ली डायनामोज संघाचे तगडे आव्हान असेल. गत सामन्यात सचिनच्या केरला संघाला नमवून मुंबई संघाने आयएसएलमध्ये दमदार पुनरागमन केले आहे. त्यामुळे आता घरच्या मैदानावर सामना जिंकण्याचा यजमान संघाचा प्रयत्न असेल.

आयएसएलमधील या दोन्ही संघाचे गुणतालिकेत प्रत्येकी सहा गुण आहेत. मुंबईचा संघ सहाव्या आणि दिल्ली संघ पाचव्या स्थानावर आहे. दुखापतीतून सावरलेल्या कर्णधार रहिम नबीच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाला विजयाची आशा आहे. त्यामुळे मुंबई संघ सामन्यात बाजी मारेल, असे चित्र आहे.

दुसरीकडे दिल्लीच्या संघाला पाचपैकी अद्याप एका लढतीत विजय मिळवता आला. या संघाचे तीन सामने बरोबरीत राहिले. तसेच एका सामन्यात दिल्लीला पराभवाला सामोरे जावे लागले.