आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयपीएलमध्ये युवराजसिंगच्या 1500 धावा पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुधाबी - वर्ल्डकपच्या फायनलमधील निराशाजनक कामगिरीने होत असलेल्या टीकेला गुरुवारी आयपीएल-7 मध्ये युवराजसिंगने चोख प्रत्युत्तर दिले. त्याने नाबाद अर्धशतकी खेळी करून बंगळुरूला दिल्लीविरुद्ध शानदार विजय मिळवून दिला. त्याने कोहलीसोबत केलेल्या 84 धावांच्या भागीदारीमुळे बंगळुरूला आठ गड्यांनी विजय मिळवता आला. यासह त्याने आयपीएलच्या करिअरमध्ये 1527 धावांचा पल्लाही यशस्वीपणे गाठला. त्याने 25.88 च्या सरासरीने 71 सामन्यांत ही उल्लेखनीय कामगिरी केली.