आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय संघाचे क्लीन स्विप देण्याचे लक्ष्य

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलावायो - कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली झिम्बाव्वेला सलग चार सामन्यांत पराभूत केल्यानंतर आता भारताने मालिकेत 4-0 ने आघाडी घेतली आहे. शनिवारी होणा-या पाचव्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाचे झिम्बाव्वेला क्लीन स्वीप देण्याचे एकमेव लक्ष्य आहे. या सामन्यातील विजयासह भारताला विदेशी खेळपट्टीवर क्लीन स्वीप देण्याची ऐतिहासिक कामगिरीची संधी आहे.
भारतीय संघाची ही उल्लेखनीय कामगिरी कर्णधार विराट कोहलीच्या नावे नोंदवली जाईल. महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाला यशोशिखरावर पोहोचवले आहे. तब्बल तीन वर्षांनंतर झिम्बाव्वेमध्ये खेळणा-या भारतीय संघातील अनेक खेळाडूंसाठी येथील खेळपट्टी व वातावरण हे नवीन आहे. मात्र, कोहलीच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंनी यशस्वीमध्ये या परिस्थितीत स्वत:ला सिद्ध केले. यामुळे भारताला सलग विजय मिळवता आला.
विराटचा रैनावर विश्वास : कर्णधार विराटने चौथ्या वनडेत तिस-या क्रमांकावर फलंदाजीसाठी सुरेश रैनाला पाठवण्याचा निर्णय घेतला. त्याने कर्णधार कोहलीचा विश्वास सार्थकी लावला. रैनाने कव्हर ड्राइव्ह, स्क्वेअरकटच्या आधारे उत्कृष्ट फलंदाजी करताना नाबाद 65 धावांची खेळी केली.
मोहित शर्मा चमकला : आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि रणजीत हरियाणाचे प्रतिनिधित्व करणारा मोहित शर्मा पदार्पणातील वनडेत चमकला. त्याने या सामन्यात दोन विकेट घेऊन कर्णधाराचा विश्वास सार्थकी लावला. मोहितमध्ये चेंडूंला दोन्ही बाजूंनी स्विंग करण्याची क्षमता आहे.
युवा ब्रिगेडने केली कमाल
कोहलीच्या युवा ब्रिगेडमधील सर्वच खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. फलंदाजीत शिखर धवन, रोहित शर्मा, सुरेश रैना, दिनेश कार्तिक आणि अंबाती रायडू, ऑलराउंडरच्या रूपात रवींद्र जडेजा आणि गोलंदाजीत जयदेव उनादकत, विनयकुमार, मो. शमी, मोहित शर्मा, अमित मिश्राने सामन्यात कौतुकास्पद कामगिरी केली.
मोहितला धोनीची आठवण झाली
आपल्या पदार्पणातील सामन्यात दोन गडी बाद करणा-या मोहितला कर्णधार महेंद्रसिंग धोनीची आठवण झाली. तो म्हणाला की, आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जकडून खेळताना माहीने दिलेल्या अनेक टिप्स महत्त्वपूर्ण ठरल्या. त्याने दबावात उत्कृष्ट कामगिरी करण्याचा दिलेला सल्ला आज कामी आला. संघात आल्यावर मी गोलंदाजीचे कोच जॉन डावेस यांचे मार्गदर्शन घेतले.
भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अंबाती रायडू, दिनेश कार्तिक, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, मो. शमी, जयदेव उनादकट, विनयकुमार, मोहित शर्मा, अमित मिश्रा.
झिम्बाब्वे : ब्रेंडन टेलर (कर्णधार), वुसी सिबांदा, सिकंदर रजा, सीन विल्यम्स, हॅमिल्टन मसकदजा, एम. वॉलर, ब्रायन विटोरी, मायकेल चिनोया, तेंदई चतारा, प्रॉस्पर उत्सया, एल्टन चिगुंबुरा, ग्रीम के्रेमर, मुतोबोजी.