आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Team For England, Bangladesh Tour Announced

जहीरला डच्चू; गौतम गंभीरचे पुनरागमन, इंग्लंडविरुद्ध धोनी तर बांगलादेश दौर्‍यावर रैना कर्णधार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - इंग्लंडच्या पाच क्रिकेट कसोटी सामन्यांच्या मोठ्या दौर्‍यासाठी भारताचा संघ आज जाहीर करण्यात आला असून या संघातील 6 मध्यमगती गोलंदाजांमध्ये अनुभवी गोलंदाज जहीर खान याला स्थान देण्यात आले नाही. 18 जणांच्या संघात गौतम गंभीर याला पुनरागमन करण्याची संधी देण्यात आली आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौर्‍यावर जाणारा हा संघ सर्वात तरुण आणि कमी अनुभव असणारा असेल. या संघाची फलंदाजीची फळी प्रथमच नवोदितांवर आधारलेली असेल. मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांच्यावर फलंदाजीचा भार असेल. जहीरला स्थान न दिले गेल्यामुळे गोलंदाजीची मदारदेखील ईशांतच्या नेतृत्वाखाली शमी, भुवनेश्वर ,वरुण अ‍ॅरोन, पंकज सिंग, स्टुअर्ट बिन्नीवर असेल.
सुरेश रैनाकडे नेतृत्व : भारतीय क्रिकेट संघाबाहेर फेकल्या गेलेल्या सुरेश रैनाला, मुख्य प्रवाहात येण्याची संधी येत्या बांगलादेश दौर्‍याच्या निमित्ताने चालून आली आहे. 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या दौर्‍यात भारतीय संघाचे नेतृत्व सुरेश रैनाकडे सोपवण्यात आले आहे.
इंग्लंडविरुद्ध कसोटीसाठी भारतीय संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, गौतम गंभीर, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, भुवनेश्वर कुमार, महंमद शामी, ईश्वर पांडे, ईशांत शर्मा, स्टुअर्ट बिन्नी, वरुण अ‍ॅरॉन, वृद्धिमान साहा, पंकज सिंग.

बांगलादेश दौर्‍यावर जाणारा भारतीय संघ
सुरेश रैना (कर्णधार), रॉबिन उथप्पा, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, अंबाती रायडू, मनोज तिवारी, केदार जाधव, वृद्धिमान साहा, परवेझ रसूल, अक्षर पटेल, विनय कुमार, उमेश यादव, स्टुअर्ट बिन्नी, मोहित शर्मा, अमित मिश्रा.