आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवा भारतीय संघ उपांत्य फेरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दुबई - बुधवारी पापुआ न्यू गिनीला (पीएनजी) पराभूत करून भारताच्या 19 वर्षांखालील क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत धडक मारली. विजय झोलच्या नेतृत्वाखाली खेळणार्‍या भारताने पीएनजीवर 245 धावांनी मोठा विजय मिळवला. भारताने दिलेल्या 301 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणार्‍या पीएनजीचा डाव अवघ्या 56 धावांवर संपुष्टात आला. चायना मॅन कुलदीप यादवने (4 बळी) पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधले.
भारताच्या अंकुश बिन्स (59) आणि अखिल हेरवाडकर (37) या सलामीवीर जोडीने 58 धावांची सलामी दिली. बिन्सने 83 चेंडंूत 5 चौकार आणि 1 षटकार लगावत अर्धशतक ठोकले. त्यानंतर आलेल्या कर्णधार विजय झोलने 37 धावा काढल्या. तो स्थिरावण्यापूर्वी नाओने त्याचा त्रिफळा उडवला. संघाचा भरवशाचा मधल्या फळीतील स्टार फलंदाज संजू सॅमसनने अर्धशतकी खेळी करत संघाची धावसंख्या उंचावली. त्याने 48 चेंडूंचा सामना करताना 8 चौकार आणि 4 षटकार खेचत 85 धावा कुटल्या. शतकाकडे वाटचाल करणाºया संजूला काबू मोर्यने अ‍ॅलन जोसेफकरवी झेलबाद केले. श्रेयस अय्यर 36 व सरफराज खानने नाबाद 34 धावा केल्या.
कुलदीपच्या ‘चायना’ची कमाल
भारताच्या चायना मॅन कुलदीप यादवने पापुआ न्यू गिनीच्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीवर नाचवले. पीएनजीचा डाव अवघ्या 56 धावांत संपुष्टात आला. रिलेय हेकुरेने सर्वाधिक 20 आणि हिरी हिरीने 13 धावा काढल्या. इतर फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. कुलदीप यादवने 8.2 षटकांत 10 धावांत 4 गडी बाद केले. मोनू कुमारने 6 षटकांत 13 धावा देत 3 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक : (भारत 50 षटकांत 6 बाद 301. अंकुश बिन्स 59, विजय झोल 35, संजू सॅमसन 85 धावा. एलेई नाव 3/46. पापुआ न्यू गिनी सर्वबाद 56. रिलेय हेकुरे 20, हिरी हिरी 13 धावा. कुलदीप यादव 4/10.)