आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Team Return Home, Dhoni Stay In Landon For The Vocation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय संघ मायदेशी परतला, सुट्यांसाठी धोनी लंडन मध्‍ये थांबला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि तिरंगी मालिका जिंकणा-या भारतीय क्रिकेट संघाचे रविवारी आगमन झाले. या वेळी कर्णधार महेंद्रसिंग धोनी सुट्यांचा आनंद घेण्यासाठी लंडनमध्ये थांबला आहे.


‘दोन महिन्यांनंतर मायदेशात परतल्याने फार चांगले वाटत आहे,’असे ईशांत शर्माने ट्विट केले. सलामीवीर रोहित शर्माचे मुंबईत आगमन झाले. ‘शेवटी मुंबईत पोहोचलो आहे. विमानतळावर जल्लोषात स्वागत झाले आहे. चाहत्यांच्या चेह-यांवरील आनंदाने रोमांचित झालो, असे रोहितने ट्विट केले. रोहितच्या मते, दोन महिन्यांचा दौरा अधिकच चांगला राहिला. भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकतर्फी विजय मिळवले. टीम इंडियाला सुरुवातीच्या दोन सामन्यांत पराभवाला सामोरे जावे लागले. पुनरागमन करत भारताने फायनल गाठून किताब जिंकला.