आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Team Win 8 Medals In Shooting At Asian Games, Divya Marathi

आशियाई स्पर्धेत नेमबाजीत भारतीय संघाने पटकावले आठवे पदक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - भारतीय खेळाडूंनी १७ व्या आशियाई स्पर्धेतील आपला दबदबा कायम ठेवत शुक्रवारी सातव्या दिवशी दोन पदकांची कमाई केली. यात एका रौप्य आणि एका कांस्यपदकाचा समावेश आहे. याशिवाय भारताने नेमबाजी प्रकारात आठव्या पदकाची कमाई केली.

पेंबा तमांग, गुरप्रीत सिंग व विजयकुमार या नेमबाजांनी भारताला २५ मीटर सेंटर फायर पिस्तुलाच्या सांघिक गटात रौप्यपदक मिळवून दिले. संदीप शेजवळने भारताला जलतरणात कांस्यपदकाची कमाई करून दिली. स्क्वॅशमध्ये भारताची दोन रौप्यपदके निश्चित झाली. यात भारताच्या महिला व पुरुष संघाने अंतिम फेरी गाठली.

नेमबाजी प्रकारात भारताने १७४० गुणांची कमाई करताना रौप्यपदकावर नाव कोरले. या गटात चीनने १७४२ गुणांसह सुवर्णपदक आपल्या नावे केले.दक्षिण कोरियाचा संघ १७३९ गुणांसह कांस्यपदकाचा मानकरी ठरला.

वैयक्तिक गटात नेम हुकला : वैयक्तिक गटात भारताचा तमांग ५८१ गुणांसह आठव्या, गुरप्रीत ५८० गुणांसह नवव्या व विजयकुमार ५७९ गुणांसह १२ व्या स्थानावर राहिला.
तेजस्विनी अपयशी : महिलांच्या ५० मीटर थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत औरंगाबादची तेजस्विनी मुळे, लज्जा गोस्वामी आणि अंजली भागवतने १७२२ गुणांसह सहावे स्थान गाठले.

50 मी. ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात रौप्य
28.26 सेकंदांत अंतर केले पूर्ण
भारतीय संघाचे जलतरण स्पर्धेतील पहिले पदक ठरले

जलतरणात संदीप शेजवळ तिस-या स्थानी
भारताच्या संदीप शेजवळने जलतरणात पुरुषांच्या ५० मीटर ब्रेस्ट स्ट्रोक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. १७ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत जलतरणात भारताचे हे पहिलेच पदक आहे. शेजवळने पाचव्या रांगेत पोहताना शानदार प्रदर्शन केले. २८.२६ सेकंदांत अंतर कापले. कझाकच्या दिमित्रीने २७.७८ सेकंदांत अंतर गाठून विक्रमासह सुवर्ण मिळवले. जपानच्या कोसेकीने २७.८९ सेकंद वेळ घेऊन रौप्यवर कब्जा केला. भारताने गत स्पर्धेत ५० मी. बटरफ्लायमध्ये वीरधवलच्या कामगिरीच्या बळावर कांस्यपदकच जिंकले होते.

स्क्वॅशमध्ये भारताचे दोन रौप्य निश्चित
द. काेरिया, कुवेतचा पराभव
महिला आणि पुरुष स्क्वॅश संघाने आशियाई स्पर्धेतील भारताची दाेन राैप्यपदके निश्चित केली. भारताच्या या दाेन्ही संघांनी उपांत्य सामने जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला.
दीपिका पल्लिकल, जोश्ना चिनप्पा आणि अनाका अलंकामाेनीने शानदार विजयासह भारताचा महिला गटाच्या अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. भारताच्या या महिला संघाने उपांत्य लढतीत यजमान दक्षिण कोरियाचा २-० अशा फरकाने पराभव केला. यासह भारताच्या संघाने आपले राैप्यपदक पक्के केले.

भारताची कुवेतवर मात
पुरुष गटाच्या उपांत्य लढतीत भारतीय संघाने कुवेतचा पराभव केला. महेश मानगावकर, साैरव घाेषाल, हरिंदरपालसिंग संधूने शानदार कामगिरी करताना भारताला २-० ने विजय मिळवून दिला. साैरव घाेषालने रंगतदार लढतीत अब्दुल्लाला ६२ मिनिटांत धूळ चारली. त्याने ११-८, ७-११, ११-९, ५-११, ११-३ ने शानदार विजय संपादन केला.
पुरुष गटाच्या उपांत्य लढतीत भारतीय संघाने कुवेतचा पराभव केला. महेश मानगावकर, साैरव घाेषाल, हरिंदरपालसिंग संधूने शानदार कामगिरी करताना भारताला २-० ने विजय मिळवून दिला. साैरव घाेषालने रंगतदार लढतीत अब्दुल्लाला ६२ मिनिटांत धूळ चारली. त्याने ११-८, ७-११, ११-९, ५-११, ११-३ ने शानदार विजय संपादन केला.

भारतीय महिला उपांत्य फेरीत
हॉकी : रविवारी भारत-काेिरया सेमीफायनल; मलेशिया पराभूत
भारतीय महिला हाॅकी संघाने विजयी माेहीम अबाधित ठेवताना १७ व्या आशियाई चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत धडक मारली. या संघाने शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत मलेशियावर ६-१ अशा फरकाने एकतर्फी विजयाची नाेंद केली. यासह भारताने अंतिम चारमधील आपला प्रवेश निश्चित केला. आता भारताचा उपांत्य सामना गत राैप्यपदक विजेत्या काेरियाशी हाेईल.

राणी रामपाल (४, २० मि.), जसप्रीत काैर (९, ३९ मि.) यांनी केलेल्या प्रत्येकी दाेन गाेलच्या बळावर भारताने सामना जिंकला. याशिवाय नमिता थापू (१७ मि.) आणि वंदना कटारिया (५० मि.) यांनी भारतीय महिला संघाच्या विजयात प्रत्येकी एका गाेलचे याेगदान दिले. मलेशियासाठी कर्णधार नादिया अब्दुलने एकमेव गाेल केला. गत सामन्यातील पराभवातून सावरलेल्या भारताने मलेशियाविरुद्ध दमदार सुरुवात केली. राणी रामपालने चाैथ्या मिनिटाला गाेल करून भारताला १-० ने आघाडी मिळवून िदली हाेती. दरम्यान, नादियाने गोल करून मलेशियाला १-१ ने बराेबरी मिळवून दिली. मात्र, त्यानंतर अवघ्या दाेन मिनिटात जसप्रीत कौरने गोल करून भारताला २-१ ने आघाडी मिळवून दिली. त्यानंतर नमिता थापू आणि राणीने गाेल करून संघाच्या आघाडीला मजबूत केले. आता भारताच्या महिला संघाला यजमान दक्षिण कोरियाला उपांत्य लढतीत घरच्या मैदानावर नमवण्याठी मोठी कसरत करावी लागेल. मात्र, भारताकडून या सामन्यात मोठ्या खेळीच आशा आहे. जसप्रीत, राणी आणि वंदना सध्या जबरदस्त फाॅर्मात आहेत.

भारत-चीन लढत आज
आशियाई स्पर्धेच्या पुरुष गटात भारतीय हाॅकी संघाचा सामना शनिवारी चीनशी हाेणार आहे. या सामन्यातील विजयासह भारताला उपांत्य फेरीतील आपला प्रवेश निश्चित करता येईल. त्यानंतर भारताला अंतिम चारमध्ये यजमान दक्षिण काेरियाच्या आव्हानाला सामाेरे जावे लागले. गत सामन्यात भारताला पाकने २-१ अशा फरकाने पराभूत केले हाेते.

सानिया- प्रार्थना ठोंबरे उपांत्यपूर्व फेरीत
भारताची टेनिसस्टार सानिया मिर्झाने शुक्रवारी सोलापूरच्या प्रार्थना ठोंबरेसोबत आशियाई स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या पाचव्या मानांकित जोडीने महिला दुहेरीच्या लढतीत अवघ्या ३५ मिनिटांत सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. सानिया-प्रार्थनाने दुहेरीच्या दुस-या फेरीत मंगाेलियाच्या बोलोर एखायार-गोटोव डुल्गंजारागलचा पराभव केला. भारताच्या जाेडीने ६-०, ६-० अशा फरकाने लढतीत एकतर्फी विजयाची नाेंद केली. भारताच्या जाेडीने प्रतिस्पर्धी खेळाडूंना प्रत्युत्तराची एकही संधी मिळू दिली नाही. आक्रमक सर्व्हिस करत सािनया-प्रार्थनाने सामन्यात विजयश्री मिळवली.

सनमची झुंज यशस्वी
जागतिक क्रमवारीत ३९७ व्या स्थानावर असलेल्या सनम सिंगने पुरुष एकेरीच्या अंतिम आठमध्ये धडक मारली. त्याने एक तास २४ मिनिटांच्या रंगतदार लढतीत येओ रुमलवर मात केली. भारताच्या या युवा खेळाडूने ७-५, ६-१ अशा फरकाने सामना जिंकून आशियाई स्पर्धेत आगेकूच केली.

युकी भांबरी तिस-या फेरीत
भारताचा युवा खेळाडू युकी भांबरीनेही विजयी मोहीम अबाधित ठेवताना आशियाई स्पर्धेच्या तिस-या फेरीत धडक मारली. त्याने पुरुष एकेरीच्या दुस-या फेरीत इंडोनेशियाच्या ख्रिस्टोफर रुंग्काटचा पराभव केला. युकीने ६-३, ६-३ अशा फरकाने सरळ दोन सेटमध्ये सामना जिंकला. याशिवाय त्याने १ तास ३० मिनिटांत अंतिम आठमध्ये धडक मारली.
अंकिताची झुंज अपयशी : भारताची नंबर वन युवा खेळाडू अंकिता रैनाने महिला तिस-या फेरीत दिलेली झंुज अपयशी ठरली. तिला चौथ्या मानांकित एरी मोझुमीने धूळ चारली. जपानच्या माेझुमीने ६-२, ४-६, ६-१ ने सामना जिंकला.