आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियाई क्रीडा स्पर्धा: कबड्डीत भारतीयांचा जयजयकार !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंचियोन - आशियाई क्रीडा स्पर्धेत कबड्डीत भारताने जबरदस्त सुरुवात केली. पुरुष तसेच महिला संघानेही शेजारी बांगलादेशला सहज धूळ चारली. महिलांनी अ गटात आपला सामना २९-१८ अशा फरकाने जिंकला. दुसरीकडे पुरुषांनी अ गटातच ३०-१५ अशा सोप्या विजयाची नोंद केली.

पुरुषांची आक्रमक चाल : पुरुषांनी सुरुवातीपासूनच जोरदार आक्रमण चढवले. पहिल्या सत्रात १० गुणांची आघाडी घेऊन १६-६ अशी मुसंडी मारली. इथून काही काळ बांगलादेशने खेळ सुधारायचा थोडासा प्रयत्न केला. पण भारतीयांनी सामन्यावरची पकड ढिली होऊ दिली नाही. दुस-या सत्रातही १४-९ ने आघाडी घेऊन सामन्यावर कब्जा केला. या विजयामुळे भारताचा हुरूप वाढला आहे. थायलंड आणि पाकिस्तानविरुद्ध भारताला आता विश्वासाने सामोरे जाता येणार आहे.

भारतीय महिलांची बांगलादेशवर २२-५ ने मात
महिलांनी तर कमालच केली. पहिल्या सत्रात त्यांनी बांगलादेशला अक्षरश: चिरडले असे म्हणता येईल. २२-५ अशी जोरदार आघाडी घेऊन विजयाची पायाभरणी केली. बांगलादेशने दुस-या सत्रात अपयश सुधारायचा प्रयत्न केला, पण तो अगदीच तोकडा होता. या सत्रातही भारतीयांनी १३-७ अशी बाजी मारली. आता त्यांचा सामना कोरियाशी होणार आहे.