आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Tenis Star Mahesh Bhupati & Bollwood Actress Lara Born Beby Girl

टेनिसपटू महेश भूपतीसाठी कन्या ठरली भाग्यशाली!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबॉर्न: भारतीय टेनिसपटू महेश भूपती आणि बॉलीवूड अभिनेत्री लारा दत्ताच्या घरात शुक्रवारी नवीन पाहुण्याचे आगमन झाले. लाराने कन्येला जन्म दिला आहे. ती या जगात येताच तिच्या वडिलांसाठी अर्थात महेश भूपतीसाठी भाग्यशाली ठरली आहे. भूपती आणि सानिया मिर्झाने ऑस्ट्रेलियन ओपनमधील सामना अगदी सहज जिंकला. त्यामुळे भूपतीला आपली कन्या 'लकी' ठरली आहे. भूपती आणि लाराने आपल्या मुलीचे नाव सायरा असे ठेवले आहे.
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि महेश भूपती या जोडीने यंदाच्या पहिल्या ग्रॅंड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपन मिश्र दुहेरी स्पर्धेतील एका सामन्यात दक्षिण ऑफ्रिकेची नताली ग्रांडीन आणि नायदरलॅंडचा जीन-ज्यूलियन रोजरया जोडीचा 6-4, 6-2 असा पराभव केला. या विजयासह भारतीय जोडीने मिश्र दुहेरीच्या दुसर्‍या फेरीत प्रवेश केला आहे. भूपतीला मुलगी झाल्याची बातमी ट्विटरच्या माध्यमातून कळली.