नवी दिल्ली - फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेतील चमकदार कामगिरीच्या बळावर
सानिया मिर्झाने महिला दुहेरीच्या क्रमवारीत सहाव्या स्थानी धडक मारली. तिने झिम्बाब्वेची आपली सहकारी कारा ब्लॅकसोबत हे करिअरमधील सर्वोत्कृष्ट स्थान गाठले. नुकतीच टेनिसची क्रमवारी जाहीर करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या फ्रेंच ओपनमध्ये सानिया-कारा या पाचव्या मानांकित जोडीने महिला दुहेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. यासह या जोडीने क्रमवारीत 430 गुणांची कमाई केली. या कामगिरीमुळे क्रमवारीत या जोडीला आठ स्थानांचा फायदा झाला. यासह सानिया-काराने टॉप-10 मध्ये सहावे स्थान गाठले. या जोडीला उपांत्यपूर्व लढतीत अव्वल मानांकित शुआई पेंग आणि सु वेई हेन्सने पराभूत केले होते.त्यामुळेच तिला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले.
यंदाच्या सत्राला सुरुवात करतानाच मी करिअरमध्ये क्रमवारीत सर्वोत्कृष्ट स्थान गाठण्याचे ध्येय निश्चित केले होते. आता हे ध्येय अवघ्या सहा महिन्यांत मला गाठता आले, याचा मला अभिमान आहे. आगामी मोठय़ा स्पर्धेतही चांगली कामगिरी करण्याचा माझा आता प्रयत्न असेल. फ्रेंच ओपनमधील कामगिरीवर सध्या मी समाधानी आहे, - सानिया मिर्झा
पुढील स्लाइडवर पाहा, सानियाची सामन्यादरम्यानची छायाचित्रे...