आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुहेरीच्या क्रमवारीत सानिया मिर्झा 16 व्या स्थानावर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- भारतीय खेळाडू सानिया मिर्झा आणि सोमदेव देववर्मनने नुकत्याच जाहीर झालेल्या वर्ल्ड रॅकिंगमध्ये क्रमश: एक आणि तीन स्थानानी प्रगती केली. सानियाने महिला दुहेरीच्या क्रमवारीत 16 व्या स्थानी धडक मारली. तिने अमेरिकेच्या बाथेनी माटेकसोबत स्टुटगॉर्ट ओपन टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीचे उपविजेतेपद पटकावले. या कामगिरीसह तिने क्रमवारीत प्रगती केली.

सोमदेवने 184 वे स्थान गाठले. युकी भांबरीने नऊ स्थानांची प्रगती केली. यासह तो आता 262 व्या स्थानी आला आहे. पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत महेश भूपती दहाव्या,रोहन बोपन्ना 11 व लियांडर पेसने 13 वे स्थान गाठले.