आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सानिया मिर्झा पोहचली रिओत, टेबल टेनिस टीमही क्रीडाग्राममध्ये दाखल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सानिया मिर्झा रिओ ऑलिंपिकमधील क्रीडाग्राममध्ये पोहचली आहे. - Divya Marathi
सानिया मिर्झा रिओ ऑलिंपिकमधील क्रीडाग्राममध्ये पोहचली आहे.
रिओ- भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि टेबल टेनिस टीम शुक्रवारपासून सुरु होणा-या रिओ ऑलिंपिकसाठी रिओतील ऑलिंपिक गावात दाखल झाली आहे. क्रीडाग्राममध्ये सानियाच्या नेतृत्त्वाखाली मिशन प्रमुख राकेश गुप्ता यांनी तिला ऑलिंपिक स्मृती चिन्ह भेट दिले. हे सर्व खेळाडूंना दिले जाते. सानिया ऑलिंपिक गावात पोहचणारी महिला टेनिस खेळाडू आहे. ती मॉन्ट्रियलमधून थेट रिओत दाखल झाली आहे. तेथे ती रॉजर्स कप टेनिस टुर्नामेंटमध्ये सहभागी झाली होती. यंदा सानिया तिस-यांदा ऑलिपिंकमध्ये सहभागी होत आहे.
महिला दुहेरीत पहिल्या क्रमांकाची सानिया रिओमध्ये महाराष्ट्रातील (बार्शी) प्रार्थना ठोंबरेसह दुहेरीत खेळेल. तर पुरुषांच्या गटात ती रोहन बोपन्नासह खेळेल. महिलांचे एकेरीचे 6 ऑगस्टपासून तर दुहेरीचे 10 ऑगस्टपासून सामने होणार आहेत.
सानियाच्या आधी भारतीय टेबल टेनिस संघही रविवारी दाखल झाला. या टीममध्ये शरद कमल, सौम्यजित घोष, मोना दास आणि मनिका बत्रा यासारखे खेळाडू सामील आहेत.
बातम्या आणखी आहेत...