आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Vice Captain Virat Kohli Batting Number Issue

भारतीय संघाचा सध्याचा सर्वोत्कृष्ट फलंदाज कोहली तिसऱ्या की चौथ्या स्थानी ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय संघाचा सध्याचा सर्वोत्कृष्ट फलंदाज विराट कोहली असल्याचे निर्विवादपणे मान्य करण्यात येत आहे. आपला सर्वोत्तम फलंदाज अधिकाधिक काळ खेळपट्टीवर राहावा, अशी योजना प्रत्येक संघाची असते. भारतीय संघदेखील त्या गोष्टीला अपवाद नसेल. असे असतानाही, विराट कोहली तिसऱ्या क्रमांकाऐवजी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी का येतो, हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे.

विराट कोहली या आपल्या सर्वोत्तम फलंदाजाला वाचवण्याचा भारतीय संघ व्यवस्थापन का प्रयत्न करीत आहे? धवन झटपट बाद झाल्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर खेळणारा फलंदाज सुरुवातीलाच फलंदाजीसाठी येतो. कोहलीसारखा फलंदाज एवढ्या लवकर प्रतिस्पर्ध्यांच्या वेगवान गोलंदाजांसमोर आणून धोका पत्करू नये, असे धोनीला वाटते. तसे त्याने इंग्लंडविरुद्ध लढतीत पराभूत झाल्यानंतर बोलूनही दाखवले. मात्र, अंबाती रायडूसारखा आत्मविश्वास नसलेला, फटक्यांची विविधता नसलेला फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर पाठवून भारताने प्रतिस्पर्धी गोलंदाजांना डोक्यावर बसवून घेतले. विराट कोहली फलंदाजीसाठी येतो, त्या वेळी भारताच्या धावफलकावर फारशा धावाही नसतात आणि पॉवरप्लेमधील षटकेही संपत आलेली असतात. कोहलीने चौथ्याच क्रमांकावर खेळावे अशी चर्चा आहे. कोहली कोणत्या क्रमांकावर खेळतो, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल.