आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Weightlifters Continue To Shine In Junior World Championships

भारतीय युवा खेळाडूंची ‘भार’दस्त कामगिरी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दोहा - येथे सुरू असलेल्या १७ व्या आशियाई यूथ आणि २२ व्या ज्युनियर महिला वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिपमधील भारतीय युवा खेळाडूंची भारदस्त कामगिरी करताना गाेल्डन चमक कायम राहिली. कतार येथील स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवताना स्पर्धेच्या दुसर्‍या दिवशी पाच पदकांची कमाई केली. यात दोन सुवर्णपदकांचा समावेश आहे. आता स्पर्धेत भारताच्या नावे एकूण सात पदके झाली आहेत. यात चार सुवर्णपदके आहेत.

युवांच्या युवक गटात भारताच्या जमजंग डेरू आणि लालू टाकूने सुवर्णपदक पटकावले. यापूर्वी महिलांच्या स्पर्धेत मोहिनी चव्हाण आणि मनालिशा सोनोवालने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. या दोघांनी चमकदार कामगिरी करताना ज्युनियर महिला स्पर्धेत भारताला दोन सुवर्णपदके मिळवून दिली.

मनोजला कांस्य
मनोज कुमारने कांस्यपदकावर नाव कोरले. त्याच्याकडून भारतीय संघाला सोनेरी यशाची आशा होती. मात्र, त्याला तिसर्‍या स्थानावर समाधान मानावे लागले. त्याने एकूण २२४ किलाे वजन उचलण्यात यश मिळवले. यासह मनोजकुमार हा कांस्यपदकाचा मानकरी ठरला. याशिवाय त्याने भारतीय संघाच्या खात्यावर एका कांस्यपदकाचीही नांेद यशस्वीपणे केली.