आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Woman Cricket Match News In Marathi, Punam Raut, Divya Marathi

पूनमचे अर्धशतकाच्या बळावर भारताचा आयर्लंडवर विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सावेर - मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने शुक्रवारी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या तयारीला शानदार विजयाने सुरुवात केली. भारताने पहिल्या सराव सामन्यात आयर्लंडचा 26 धावांनी पराभव केला. पूनम राऊतच्या (50) नाबाद अर्धशतकापाठोपाठ शिखा पांडेच्या (3/24) धारदार गोलंदाजीच्या बळावर भारताने सामना जिंकला.


येत्या रविवारपासून महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ होत आहे. यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात सलामी सामना रंगणार आहे. तसेच भारताचा स्पर्धेतील पहिला सामना सोमवारी श्रीलंकेशी होईल. या स्पर्धेच्या तयारीसाठी भारताचा पहिला सराव सामना आयर्लंडशी झाला. यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 4 गड्यांच्या मोबदल्यात 148 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात आयर्लंडला 9 गडी गमावून अवघ्या 122 धावांपर्यंत मजल मारता आली.


धावांचा पाठलाग करणा-या आयर्लंडला शिलिंग्टन (47) आणि फ्लानागन (16) यांनी 61 धावांची सलामी दिली. शिलिंग्टनने 43 चेंडूंत सहा चौकारांसह एक षटकार ठोकून संघाकडून सर्वाधिक 47 धावा काढल्या. त्यापाठोपाठ हार्वर्ड 15, वालड्रोनने 16 धावांचे योगदान दिले. गोलंदाजीत भारतीय संघाच्या शिखा पांडेने तीन आणि सोनिया डबीरने दोन गडी बाद केले.


सोनियाचा दिनु..!
भारताकडून कर्णधार मिताली राज (42) आणि मनधनाने (20) दमदार सुरुवात करताना पहिल्या गड्यासाठी 51 धावांची भागीदारी केली. त्यापाठोपाठ पूनमने नाबाद 50 धावांचे योगदान दिले. तसेच सोनिया डबीरने 15 धावांची खेळी केली. यासह तिने गोलंदाजीत दोन विकेटही मिळवल्या.