आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Woman Cricket Team Tour For England, Divya Marathi, India

भारतीय महिलांच्या कसोटीला मुहूर्त!, 7 ऑगस्टपासून इंग्लंड दौ-यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मिथाली राज - Divya Marathi
मिथाली राज
नवी दिल्ली - तब्बल आठ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कसोटीला मुहूर्त लागला आहे. येत्या 7 ऑगस्टपासून भारतीय महिला संघ कसोटीसाठी इंग्लंडचा दौरा करणार आहे. याच दौ-याच्या माध्यमातून भारताच्या महिलांना एक कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली आहे. यापूर्वी भारताने 2006 मध्ये शेवटची कसोटी खेळली होती.

मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ या इंग्लंड दौ-यात एका कसोटीसह तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी मितालीकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले. तसेच माजी कर्णधार झुलन गोस्वामीचाही भारतीय संघात समावेश करण्यात आला. या वेळी करुणा जैनची संघाच्या उपकर्णधारपदी वर्णी लागली आहे.
आठ वर्षांपूर्वी कसोटी खेळणा-या भारतीय संघातील तीन खेळाडूंचा इंग्लंड दौ-यात समावेश आहे. यात गोस्वामीसह मिताली आणि करुणा जैन सहभागी आहे. या कसोटीत झुलनने दहा विकेट आणि मितालीने अर्धशतकी खेळी केली होती.

2006 नंतर प्रथमच व्हाइट ड्रेसमध्ये
तब्बल 2006 नंतर प्रथमच भारताच्या महिला संघाला व्हाइट ड्रेस परिधान करून मैदानावर उतरण्याची संधी मिळणार आहे. भारत व इंग्लंड यांच्यात 2006 मध्ये कसोटी सामना रंगला होता. त्यानंतर संघाला कसोटीची संधीच मिळाली नाही.

भारताचे इंग्लंड दौ-याचे वेळापत्रक
7 ते 8 ऑगस्ट पहिला सराव सामना
13-16 ऑगस्ट पहिली कसोटी
19 ऑगस्ट 50 षटकांचा सराव सामना
21 ऑगस्ट पहिला वनडे
23 ऑगस्ट दुसरा वनडे
25 ऑगस्ट तिसरा वनडे

भारतीय संघ
मिथाली राज (कर्णधार), करुणा जैन (उपकर्णधार), स्मृती मधांना, एम.डी. थिरुक्षामिनी, पूनम राऊत, हरमनप्रीत कौर, झुलन गोस्वामी, निरजंन एन., शुभलक्ष्मी शर्मा, राजेश्वरी गायकवाड, एकता बिस्ट, स्वगतिका राठ, वनिता व्ही. आर, सुषमा वर्मा.