आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Women Clinch Gold In 4x400m Relay On Final Day

भारतीय महिला धावपटूंनी पटकावले गोल्‍ड मेडल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- 20 व्‍या अशियाई क्रीडा स्‍पर्धेच्‍या अखेरच्‍या दिवशी भारतीय महिला संघाने 4x400 मीटर स्‍पर्धा जिंकून गोल्‍ड मेडलवर नाव कोरले. चीनने आपले अव्‍वल स्‍थान कायम राखले आहे.

यजमान भारताने पाचव्‍या आणि अखेरच्‍या दिवशी आठ पदकांची कमाई केली. यामध्‍ये एक गोल्‍ड मेडलबरोबर दोन सिल्‍व्‍हर आणि पाच ब्रांझपदके पटकाविली. अखेरच्‍या दिवशी भारतीय स्‍पर्धकांना पाठींबा देण्‍यासाठी शिवछत्रपती स्‍टेडिअममध्‍ये मोठी गर्दी झाली होती.

यावेळी आशियाई स्‍पर्धेत भारताने दोन गोल्‍ड, पाच सिल्‍व्‍हर आणि 10 ब्रांझ पदके पटकावून 2011 साली कोबे येथे झालेल्‍या स्‍पर्धेपेक्षा सरस कामगिरीची नोंद केली.