आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Women Hockey Team Entry In Championship 2013

भारतीय महिला हॉकी संघ चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काकामिगहारा- भारतीय महिला हॉकी संघाने विजयी दौड कायम ठेवताना सांघिक कामगिरीच्या बळावर सोमवारी दुसर्‍या साखळी सामन्यात मलेशियाला 5-1 ने दडपून जपानमध्ये सुरू असलेलया आशियाई महिला हॉकी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत धडक दिली.

भारताकडून पूनम राणी, नमिता टोप्पो, रितू राणी, अमनदीप कौर व दीप एक्का यांनी प्रत्येकी एक गोल करून संघाच्या विजयात हातभार लावला.
मलेशियाविरुद्ध दुसर्‍या साखळी सामन्यात पूर्वार्धात उभय संघ 1-1 ने बरोबरीत होते. उत्तरार्धात मात्र भारतीय महिला हॉकीपटूंनी आक्रमणात धार आणून मलेशियाच्या गोल क्षेत्रावर सातत्याने हल्ले चढवले. अचूक पासेस, सुरेख ताळमेळ आणि परिणामकारक रणनीतीच्या आधारे भारतीय महिलांनी चार गोल ठोकून सामन्याचे पारडे भारताच्या बाजूने झुकवले. त्यामुळे भारताला बरोबरीत रोखण्याचे मलेशियाचे मनसुबे उधळले गेले.

भारताला यानंतर जपानविरुद्ध साखळी सामना खेळायचा आहे. जपानही दोन्ही साखळी सामने जिंकून अंतिम फेरीत धडकला आहे. परिणामी, जपान व भारतादरम्यानची साखळी लढत ही अंतिम सामन्याची रंगीत तालीम ठरेल. या आधीच्या लढतीत भारतीय महिलांनी विजेतेपदाचा प्रबळ दावेदार व बलाढ्य संघ चीनला नमवून खळबळ उडवून दिली होती. या विजयामुळे भारताचा आत्मविश्वास बळावला.

मलेशियावर यांनी ठोकले गोल
मलेशियाविरुद्ध संघाला विजय मिळवून देण्यात पूनम राणी, नमिता टोप्पो, रितू राणी, अमनदीप कौर व दीप एक्काच्या प्रत्येकी एका गोलचा महत्त्वाचा वाटा राहिला. त्यामुळे भारतीय महिला संघाने विजेतेपदासाठी खेळण्याचा अधिकार मिळवला.