आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Women Hockey Team To Play Australia Today

वुमन्स ज्युनियर हॉकी वर्ल्डकप: भारतीय महिलांची गाठ आज कांगारूंशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जर्मनी येथील ज्युनियर हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय महिलांचा सामना शनिवारी बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारतीय संघाला या सामन्यातून विजयी अभियानाचा श्रीगणेशा करण्याची संधी आहे. क गटातील हा सामना भारताला खडतर आव्हान आहे.

18 सदस्यांच्या भारतीय संघाचे नेतृत्व सुशीला चानू करत आहे. भारताशिवाय क गटात न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि रशिया या संघाचाही समावेश आहे.

या स्पर्धेत एकूण 16 संघांचा सहभाग आहे. ऑस्ट्रेलियाशी दोन हात केल्यानंतर भारताला लगेचच म्हणजे रविवारी न्यूझीलंडशी भिडावे लागेल. त्यानंतर 30 जुलैला मंगळवारी रशियाशी टक्कर द्यावी लागणार आहे. प्रत्येक गटातून दोन सर्वश्रेष्ठ संघ उपउपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. 2 ऑगस्टला उपांत्य फेरी आणि 4 ऑगस्ट रोजी स्पर्धेतील अंतिम सामना खेळवला जाईल.

भारतीय संघ
गोलकीपर : सनारिक चानू, बीगन सो.
डिफेन्डर : पिंकी देवी, दीप ग्रेस इक्का, नमिता टोप्पो, मनजित कौर, एम.एन.पुनाम्मा, सुशीला चानू (कर्णधार), मोनिका.
मिडल फिल्डर : लिली चानू, लिलीमा मिंझ, नवज्योत कौर, वंदना कटारिया, रितुशा आर्या.
फॉरवर्ड : पूनम राणी (उपकर्णधार), अनुपा बार्ला, नवनीत कौर.