आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला क्रिकेटः बांगलादेशविरुद्ध वनडे मालिका भारताच्या नावे !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद - कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (103) दुस-या शतकाच्या मदतीने भारतीय महिला क्रिकेट संघाने बांगलादेशला दुस-या वनडेत 46 धावांनी पराभूत करून तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने विजयी आघाडी घेतली आहे. भारताने 50 षटकांत 6 बाद 256 धावा काढल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशला 9 बाद 210 धावाच काढता आल्या.

आता मालिकेतील तिसरा आणि अखेरचा वनडे 12 एप्रिल रोजी अहमदाबाद येथे होईल. बांगलादेशच्या फलंदाजांनी भारतीय आव्हानाचा शानदार पाठलाग केला. 35 व्या षटकात बांगलादेशने 3 बाद 142 धावा काढल्या होत्या. यानंतर धावगती वाढवण्याच्या नादात त्यांनी विकेट गमावल्या. रुमाना अहेमदने शानदार 75 धावांची खेळी केली. एकता बिष्टने तीन विकेट घेतल्या. कर्णधार हरमनप्रीतने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही जोर दाखवताना 2 गडी बाद केले. यापूर्वी भारतीय कर्णधाराने 100 चेंडूंत वेगवान 103 धावा काढल्या. यात तिने 11 चौकार आणि 2 षटकार मारले. पूनम राऊतने 104 चेंडूंचा सामना करताना 80 धावांची खेळी केली. यात तिने 9 चौकार मारले.

संक्षिप्त स्कोअर । भारत 6/256, बांगलादेश 9/210.