आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Indian Women Won Gold Medal In World Achary Competation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्ल्डकप तिरंदाजी स्पर्धेत भारतीय महिलांना मिळवले सुवर्ण पदक !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्रोक्लाव - भारतीय महिला तिरंदाजांनी शानदार कामगिरी करताना पोलंडच्या व्रोक्लाव येथे सुरू असलेल्या वर्ल्डकप तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. दीपिकाकुमारी, एल. बोम्बल्या देवी, रिमिल बुरुली यांच्या संघाने रविवारी ही सुवर्ण कामगिरी रिकर्व प्रकारात केली. तिरंदाजीतील अव्वल संघ कोरियाला पराभूत करून भारतीय खेळाडूंनी तिरंगा फडकावला.
फायनलमध्ये भारतीय महिला संघाने 219 गुण मिळवले, तर दुस-या क्रमांकावर असलेल्या कोरियन संघाला 215 गुणांपर्यंतच मजल मारता आली. सामन्यादरम्यान एकवेळ भारत आणि कोरियन संघ 163 गुणांवर बरोबरीत होते. तेथील वातावरणाने आणि वा-याच्या वेगामुळे भारतीय तिरंदाजांनी आपली रणनीती बदलली. कोरियाच्या युन ओ ही, की बो बे आणि जो हयून जुंग या तिघींपेक्षा अधिक गुण मिळवून भारतीय महिलांनी सर्वोत्तम कामगिरी केली. विशेष म्हणजे कोरियाच्या या तिन्ही खेळाडूंनी फायनल वगळता संपूर्ण स्पर्धेत कधीही 222 गुणांपेक्षा कमी स्कोअर केला नाही. याच कोरियन संघाने अमेरिका, इटली आणि रशियाला पराभूत करून फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र, फायनलमध्ये भारतीय तिरंदाज वरचढ ठरल्या. डेन्मार्कने कांस्य पदक जिंकले.


आशियाई सुवर्णाच्या प्रबळ दावेदार
जगातील नंबर वन कोरियाला पराभूत करून भारतीय महिला तिरंदाजी संघाने विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी केली. या सोनेरी यशामुळे भारतीय महिला संघ आगामी आशियाई चॅम्पियशिपचा प्रबळ दावेदार ठरला आहे.
रविशंकर, प्रशिक्षक, तिरंदाजी संघ