आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Indian Womens Cricket Team Wins Against Bangladesh In First ODI

हरमनप्रीतचे अर्धशतक; बांगलादेशविरुद्ध भारतीय महिला विजयी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदाबाद- भारतीय महिला संघाने सोमवारी पहिल्या वन डेत बांगलादेशचा 5 गड्यांनी पराभव केला. कर्णधार हरमनप्रीत कौरने (63) केलेल्या नाबाद अर्धशतकाच्या बळावर यजमानांनी सामना जिंकला. यासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्या टीमने 9 गडी गमावून 194 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात यजमानांच्या महिला संघाने 5 गड्यांच्या मोबदल्यात 196 धावा काढल्या. मालिकेतील दुसरा वन डे बुधवारी अहमदाबाद येथे होईल.

धावांचा पाठलाग करणा-या भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर पूनम राऊत भोपळा न फोडता पॅव्हेलियनमध्ये परतली. तिस-या क्रमांकावर आलेली मोना मेश्राम व सलामीवीर थिरुषी कामिनीने दुसºया गड्यासाठी 37 धावांची भागीदारी केली. सलमाने ही जोडी फोडली. तिने मेश्रामला (22) फहिमा खतुनकरवी झेलबाद केले.त्यानंतर कामिनी (23) धावबाद झाली.

सोलापूरची अनघा देशपांडे चमकली - सोलापूरच्या अनघा देशपांडेने बांगलादेशविरुद्ध वन डे सामन्यात चांगली कामगिरी केली. तिने कर्णधार हरमनप्रीत कौरसोबत चौथ्या गड्यासाठी 83 धावांची मोठी भागीदारी केली. या दोघींच्या अर्धशतकी भागीदारीच्या बळावर भारताने विजयाचा मार्ग सुकर केला. अनघाने 50 चेंडूत पाच चौकार ठोकून 47 धावा काढल्या. तिला जहनारा आलमने पायचीत केले.

हरमनप्रीत एकटी लढली
कर्णधार हरमनप्रीत कौरने नाबाद अर्धशतक ठोकून भारताला विजय मिळवून दिला. तिने 100 चेंडूत तीन चौकार ठोकून 63 धावा काढल्या. एस. राठ (17) व एन. निरंजना (12*) यांनी मोलाची साथ दिली. जे.आलमने 2 व सलमा खतुनने एक बळी घेतला.

सलमाचे अर्धशतक व्यर्थ
तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करणाºया बांगलादेशकडून कर्णधार सलमा खतुनने नाबाद 75 धावा काढल्या. तिने 82 चेंडूत 11 चौकार ठोकले. यासह रुमना अहमद (38) व लता मोंडालने (39) तिसºया गड्यासाठी 57 धावांची भागीदारी केली.