आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय महिला सातव्या स्थानी, जपानच्या महिला संघाचा २-३ ने पराभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅस्टिंग्स - भारतीय महिला संघाने हाकेस बे चषक हाॅकी स्पर्धेत रविवारी सातवे स्थान पटकावले. भारतीय संघाने झालेल्या सामन्यात जपानचा ३-२ अशा फरकाने पराभव केला. यासह भारतीय महिला संघ सातव्या स्थानाचा मानकरी ठरला. राणीने ५७ व्या मिनिटाला केलेल्या विजयी गाेलच्या बळावर भारताने सामना जिंकला. या वेळी जपानच्या महिला संघाला अाठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.

दमदार सुरुवात करताना जपानने चाैथ्या मिनिटाला सामन्यात १-० ने अाघाडी घेतली हाेती. त्यानंतर युकारी यामामाेताेने २० मिनिटांत जपानच्या अाघाडीला २-० ने मजबूत केले. २८ मिनिटांपर्यंत झुंज द्यावी लागली. यासह भारताने सामन्यात पहिला गाेल केला. सुशीलाने २८ व्या मिनिटाला गाेल केला. दीपिका (५४ मि.) व राणीने (५७मि.) गाेल केले. यासह भारताने सामना अापल्या नावे केला.

अाॅस्ट्रेलियाला विजेतेपद
या स्पर्धेत अाॅस्ट्रेलियाच्या महिला संघाने विजेतेपद पटकावले. या संघाने अंतिम सामन्यात यजमान न्यूझीलंडवर ३-२ ने मात केली. यासह अाॅस्ट्रेलियाने किताब अापल्या नावे केला. तसेच अमेरिका संघाने पाचव्या स्थानाचा बहुमान पटकावला. या संघाने अर्जेंटिनावर ३-० ने मात केली.