आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाकेस बे चषक हाॅकी स्पर्धा; भारतीय महिला टीमने अाॅस्ट्रेलियाला राेखले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅस्टिंग (न्यूझीलंड) - रितू राणीच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला टीमने हाकेस बे चषक हाॅकी स्पर्धेतील अापली पराभवाची मालिका यशस्वीपणे खंडित केली. भारताच्या महिला टीमने मंगळवारी स्पर्धेतील अापल्या तिस-या सामन्यात जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या अाॅस्ट्रेलियाला बराेबरीत राेखले. राेमांचकपणे रंगलेला हा सामना शून्य गाेलने बराेबरीत राहिला. यासह भारतीय महिला टीमने गुणतालिकेत अापल्या नावे गुणांचे खाते उघडले. यापूर्वी झालेल्या दाेन्ही सामन्यांत भारताला सलग पराभवाला सामाेरे जावे लागले. मात्र, गाेलरक्षकाने केलेल्या शानदार खेळीच्या बळावर भारतीय संघाला हा पराभव राेखता अाला. सविताने उत्कृष्ट खेळी करून बलाढ्य प्रतिस्पर्धी अाॅस्ट्रेलियाच्या अाव्हानाला यशस्वीपणे परतवून लावले.

अाॅस्ट्रेलियाची झुंज अपयशी
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या अाॅस्ट्रेलिया टीमने जाेरदार झुंज दिली. मात्र, शेवटच्या मिनिटापर्यंत या टीमला सामन्यात विजय संपादन करता अाला नाही. या वेळी अाॅस्ट्रेलियाच्या महिला टीमने दिलेली झंुज सपशेल अपयशी ठरली. सामन्याच्या १५ व्या मिनिटाला अाॅस्ट्रेलियाला दाेन वेळा पेनाॅल्टी काॅर्नरची संधी मिळाली हाेती. मात्र, खेळाडूंना गाेल करता अाला नाही.

गुरुवारी न्यूझीलंडचे अाव्हान
येत्या गुरुवारी भारतीय महिला टीमचा यजमान न्यूझीलंड संघाचे अाव्हान असेल. भारतीय महिला टीम स्पर्धेतील अापल्या चाैथ्या सामन्यात विजयासाठी प्रयत्नशील राहील. या सामन्यातील विजयासह भारताला दमदार पुनरागमन करण्याची संधी अाहे.

सविताची सावध खेळी
भारतीय संघाची युवा गाेलरक्षक सविताने सावध खेळी करून अाॅस्ट्रेलियाच्या विजयाचे प्रयत्न हाणून पाडले. पहिल्या क्वार्टरमध्ये अाॅस्ट्रेलियाने दाेन वेळा गाेल पाेस्टवर हल्ला केला. मात्र, सविताने सरस खेळी करताना हा हल्ला यशस्वीपणे परतवून लावला. त्यानंतर दुसऱ्या अाणि तिसऱ्या क्वार्टरमध्येही अाॅस्ट्रेलियाच्या टीमला गाेल करता अाला नाही. त्यामुळे टीमचे विजयाचे स्वप्न अपूर्ण राहिले.