आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आशियाई इनडोअर स्पर्धा: कबड्डीत पुरुष, महिला गटांत भारत विजेता

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दक्षिण कोरियातील इनचॉन येथील अन्सून संगास्कू जिम्नॅशियमच्या बंदिस्त क्रीडांगणावर झालेल्या चौथ्या आशियाई इनडोअर आणि मार्शल आर्ट्स क्रीडा स्पर्धेच्या कबड्डीतील दोन्ही गटांत अपेक्षेप्रमाणे भारताने सुवर्णपदक पटकावले.


पुरुषांच्या अंतिम सामन्यात भारताने इराणचा प्रतिकार 42-32 असा संपुष्टात आणला व विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली. मध्यंतरापर्यंत 19-16 अशी कडवी लढत देणा-या इराणचा प्रतिकार उत्तरार्धात मात्र दुबळा ठरला. महिला गटात भारताने इराणलाच 54-31 असे 23 गुणांच्या फरकाने सहज नमवत आपणच या स्पर्धेचे अजिंक्य आहोत, हे पुन्हा सिद्ध केले. मध्यंतरालाच 28-14 अशी 14 गुणांची भक्कम आघाडी घेत आपला इरादा स्पष्ट केला. मध्यंतरानंतर सावध खेळ करत असलेली आघाडी टिकवत विजयावर शिक्कामोर्तब केले.